Mumbai (प्रतिनिधी) : कर्नाटकमधील विजापूर येथील श्री दुर्गा देवी मंदिराचे वर्धापन दिन येत्या ५ जुलै २०२४ रोजी सोमदेवहट्टी तांडा नंबर 1 येथे आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने देशभरातील बंजारा समाजाचे प्रतिनिधी, राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येणार आहे. देशभरातील बंजारा समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येत असल्याचे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत जागणु महाराज यांनी माहिती दिली. ठाण्यात आयोजित एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
संत जागणु महाराज यावेळी म्हणाले की, दरवर्षी श्री माता दुर्गा देवीचा वार्षिक यात्रा महोत्सव सर्व पारंपारिक आनंद आणि धार्मिकतेने साजरा केला जातो. देशभरातून हजारों भक्त श्री माता दुर्गा देवीचा आशीवाद घेण्यासाठी दुर्गा देवीच्या वार्षिक यात्रेच्या महोत्सवात सहभागी होत असतात. या भक्तांशिवाय केंद्रीय मंत्री व विविध राज्याचे मुख्यमंत्री व आमदार देखील या कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि दुर्गा मातेचे दर्शन घेत असतात. दुर्गा देवीचे वार्षिक यात्रा महोत्सव साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे बंजारा समाजांमध्ये जागरुकता एकता निर्माण करणे, त्यांना समृद्ध रंगीबेरंगी परंपरेबद्दल शिक्षित करणे. सेवालाल, हातीरामबाबा आणि महासाथीस इत्यादी त्यांच्या आध्यात्मिक गुरूंची माहिती प्रदान करणे, राष्ट्रीय उपक्रमांमध्ये त्याना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे प्रमुख हेतू या कार्यक्रममागे असल्याचे जागणु महाराज यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment