विद्यापीठ अनुदान आयोगाने सुनावले ; लवकरच पदे भरण्याची दिली सुचना
प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील अकृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऽया महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची मोठ्याप्रमाणात कमतरता असल्याचे संघटनांच्यावतीने वेळोवेळी सरकारच्या निदर्सनास आणून दिले आहे मात्र आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) महाराष्ट्रातील विद्यापीठे प्राध्यापकांची पदे भरण्यास पिढाडीवर असल्याचे सुणावले आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ही प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरीत भरण्याचे आदेश युजीसीच्यावतीने देण्यात आले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर जाले असून आता सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु जाल्या आहेत. असे असतांना युजीसीच्यावतीने राज्यातील महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापकांची पदे भरण्याची सुचना दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यापीठ पदे भरण्यात इतर राज्याच्या तुलणेत पिछाडीवर असल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे येणाऽया नविन सरकारला प्राध्यापक भरतीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे चित्र युजीसीच्या सुचनेनंतर निमार्ण जाले आहे. राज्यातील अनुदानित कॉलेज, विद्यापीठांशी संलग्न कॉलेज आणि शासकीय कॉलेजांमधील रिक्त जागा भरण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले आहेत. युजीसीने या जागा भरण्यासाठी १॰ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली असून यानंतरही प्राध्यापकांच्या जागा न भरल्यास कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी युजीसीने तब्बल पाचव्यांदा विद्यापीठांना पत्र लिहिले आहे.
देशभरातील विद्यापीठांशी संलग्न कॉलेजांमधील प्राध्यापकांच्या ५ लाख जागा भरण्याचे आदेश युजीसीने जूनमध्ये दिले होते. राज्यातील विद्यापीठे, संलग्न कॉलेज, शासकीय, अशासकीय अनुदानित आणि खासगी संस्थांमध्ये प्राध्यापकांच्या ११ हजार जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या जागा भरण्यात येत नसल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ लागला आहे. रिक्त जागा भरण्यासाठी प्राध्यापक संघटनांनी आंदोलन केले होते. यानंतरही उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीकडे दुर्लक्ष केले होते. अखेर या प्रकरणामध्ये युजीसीने लक्ष घातले आहे. महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्याबाबत युजीसीने यापुर्वी चार वेळा विद्यापीठे, खासगी संस्थांना सूचना केल्या होत्या. यासाठी २॰ सप्टेंबरची मुदतही देण्यात आली होती. यानंतरही विद्यापीठांनी या जागा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे युजीसीने पुन्हा विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र पाठवून रिक्त जागा १॰ नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ ३५८॰ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तीही अपूर्ण राहिली असल्याने प्राध्यापकांची पदे भरण्यामध्ये राज्य पिछाडीवर गेले असल्याचा आरोप नेट सेट उत्तीर्ण उमेदवारांकडून होऊ लागला आहे.

Seetyanayak
ReplyDelete