हाडांच्या आरोग्यासाठी आयआयटी मुंबईचा पुढाकार

हाडांच्या आरोग्याबाबत करणार जनजागृती ; देशभरात ३॰ ठिकाणी शिबीर

प्रतिनिधी
मुंबई
जागतिक आॅस्टिओपोरोसिस दिनाच्या पाश्र्वभूमिवर आयआयटी मुंबईच्यावतीने मानवी शरीराच्या हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात ३॰ ठिकाणी शिबीर राबविणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. २॰ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत होणाऽया या बोल्ट शिबीराचा फायदा जवळपास ५ हजार नागरीकांना होणार असल्याचा दावा यावेळी आयआयटीकडून करण्यात आले. टेकफेस्टची टीम यावेळी मोफत स्क्रीनिंग आणि आरोग्याबाबत सल्ला देणार आहे.
महिलांनी तीसी ओलांडल्यानंतर त्यांच्या हाडांची जिज आणि मिनिरल्स कमी होण्यास सुरुवात होते असल्याचे संशोधनामध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरीकांना या जागतिक आॅस्टिओपोरोसिस दिनाच्या पाश्र्वभूमिवर हाडांचे आरोग्य कसे राखावे हे पटवून देण्यासाठी आयआयटी मुंबईच्यावतीने देशभरात शिबिराचे आयोजन केले आहे. केवळ मुंबईत १९ ठिकाणी हे कॅम्प लावण्यात येणार आहे. पहिल्या लहान प्रमाणात दिसणाऽया या हाडांचे आजार पुढे जाऊन गंभीर रुप घेऊ शकतात. त्यामुळे वेळेच सावध होऊन त्यावर उपचार करणे योग्य असल्याचे मत यावेळी डॉक्टरांच्यावतीने व्यक्त करण्यात येते. टेकफेस्टच्या टिमकडून नेमण्यात आलेल्या हाडांचे तज्ज्ञ यावेळी नागरीकांना मोलाचा सल्ला देणार असून याचा फायदा देशभरातील ५ हजार नागरीकांना होणार असल्याचा दावा यावेळी आयआयटी मुंबईच्यावतीने करण्यात आले आहे. 

Comments