निवडणूकीनंतर ईव्हिएम मशीन रात्री उशीरापर्यंत जमा
प्रतिनिधी
मुंबई
विधानसभा निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी नेमण्यात आलेल्या अनेक शिक्षकांना ईव्हिएम मशीन जमा करुन वेळेवर घरी पोहोचण्यात यश आले आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळी अनेक शिक्षक दुसऽया दिवसी सकाळी घरी पोहोचले होते. यंदाही काहि शिक्षकांना घरी जाण्यास उशीर जाला मात्र दुसऽया दिवशी ते शाळेत वेळेवर पोहोचले असल्याची माहिती यावेळी मिळाली. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने शिक्षकांची योग्य काळजी घेतली होती.
विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून शिक्षकांना विविध ड्युटी लावली असून यात संपूर्ण दिवस व्यस्त असणाऽया शिक्षकांना सोमवारी रात्रीपर्यंत ईव्हिएम मशीन जमा करण्याची जबाबदारी होती. लोकसभा निवडणूकीला अनेक शिक्षकांना ही मशीन जमा करण्यासाठी सकाळपर्यंत वाट पहावी लागली होती. अनेक शिक्षकांनी मतदान केंद्रावरच दोन दिवस काढले होते. त्यामुळे अशा कारभारामुळे शिक्षक या निवडणूक कामाच्या जबाबदारी पासून दुर पळतात. निवडणूक आयोगाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे शिक्षकांना मदतीसाठी बोलविण्यात येतात. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी यंदा निवडणूक आयोगाच्यावतीने चांगले नियोजन करण्यात आले होते. निवडणुकीच्या एक दिवस आधीपासून सुरु जालेली ही प्रक्रिया मतदानाच्या रात्रीपर्यंत सुरु होती. रात्री उशीरापर्यंत शिक्षकांनी ईव्हिएम मशीन निवडणूक अधिकाऽयाच्या देखरेखीखाली जमा करण्यात आले.
मुंबईबाहेर निवडणुकीची ड्युटी ज्या शिक्षकांना मिळाली होती त्यांना मात्र घरी येण्यास उशीर जाला. काहि अपवाद वगळता इतर शिक्षक निवडणुकीचे काम संपवून आपल्या घरी रात्री उशीरा पोहोचले. घरी येण्यास उशीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाला माहिती होती त्यामुळे मंगळवारी शाळेत उशीराने येणाऽया शिक्षकांची गैरहजेरी लावू नये असा आदेश यावेळी निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आले होते.
Comments
Post a Comment