बोर्डाच्यावतीने शिक्षकांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन


शाळा - कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षकांचा समावेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने राज्यातील नऊ विभागातील शाळा - कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांसाठी राज्य स्तरीय निंबध स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील हजारो शिक्षक या निबंध स्पर्धेत सहभागी होणार असून १५ डिसेंबरपर्यंत शिक्षकांना आपले निबंध बोर्डाकडे सादर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
राज्य बोर्डाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पधार्चे आयोजन केले आहे. शिक्षकांना निबंध लिहून मुख्याध्यापकांच्या मार्फत बोर्डाच्या मुख्य कार्यालयाला पाठवायचे आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन २॰१९-२॰ असे स्पष्ट उल्लेख पोस्ट पाकिटावर करण्याचे सुचना यावेळी दिले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा गुणवत्ता विकासासाठी उपयोग, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक, माजे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, जलव्यवस्थापन - जलसुरक्षेत शिक्षणाची भूमिका आणि ज्ञानरचनावादानुसार अध्ययन प्रक्रियेचे अपेक्षित स्वरुप या विषयांवर शिक्षकांना निबंध लिहून बोर्डाच्या मुख्य कार्यालयाला १५ डिसेंबर २॰१९ पर्यंत पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.




Comments

Post a Comment