समग्र शिक्षा,राज्य प्राथमिक शिक्षक परीषदेचा निर्णय
मुंबई : राज्यातील अनुदानित आणि सरकारी शाळेतील शिक्षकांना ओळखपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परीषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. हे ओळखपत्र समग्र शिक्षा अभियान अंतर्गत देण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ९३ लाखाचा निधीदेखील मजुंर करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील ३ लाख ८७ हजार १६४ शिक्षकांना त्यांची ओळख मिळणार आहे.
शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात परीवर्तन घडवून आणण्यासाठी भारत सरकारच्यावतीने कार्यक्षमता प्रतवारी दर्शके याची रचना करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षकांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अंतर्गत उपक्रमाखाली सरकारी - अनुदानित शाळेतील ३ लाख ८७ हजार शिक्षकांना यु - डायस प्लस या नावाचे ओळखपत्र मिळणार, शिक्षकांच्या एका ओळखपत्रासाठी ५॰ रुपये खर्च येणार आहे. त्याप्रमाणे १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार आहे. या ओळखपत्रावर महाराष्ट्र सरकारचा लोगो नसणार. सरकारी आणि अनुदानित शाळा असा उल्लेख असणार. शिक्षकांना तालुकास्तरावर ओळखपत्र तयार करुन घ्यायचे आहे.
छान योजना आह पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete