राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण
मुंबई : दिवाळी सणाच्या निमित्ताने आॅक्टोबरचे वेतन २५ तारखेच्या आधी येणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे. अनेक शिक्षकांचे वेतन खात्यात जमा जाले नसल्याच्या तक्रारी शिक्षकांनी संघटनांकडे केली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांची दिवाळी वेतनाविनाच होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिवाळी सण आनंदाचे साजरा करता यावा यासाठी शिक्षक संघटनांच्यावतीने २५ आॅक्टोबर पूर्वी या महिण्याचा पगार देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावर उपसचिव इंद्रजित गोरे यांनी वेतन दिवाळी आधी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र लेखा - कोशागार विभागाने त्यांच्या सुचनांना केराची टोपली दाखवत अनेक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऽयांचे वेतन रखडवले असल्याचे चित्र राज्यभरात आहे. मुंबईतील काहि शिक्षकांचे वेतन जाले आहेत मात्र काहि शिक्षकांना अद्यापही वेतन मिळाले नाही त्यामुळे असा भेदभाव कशाला असा सवालदेखील शिक्षकांच्यावतीने करण्यात येत आहे. शिक्षक संघटना बँकेवर खापर फोडत आहे. तर काहि शिक्षक संघटना लेखा - कोशागार विभाग सहकार्य करत नसल्याचा आरोप करत आहे. मात्र या सर्व संवादाच्या अभावामुळे शिक्षकांचे वेतन मात्र दिवाळीच्या पहिले जमा जाले नाही ही सत्य परिस्थिती आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाचे शिवाजी खांडेकर म्हणाले की, दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार एकत्र मिळणे अपेक्षित असताना केवळ वेतन पथक कार्यालयाच्या अनास्थेमुळे सप्टेंबर महिन्याचेच वेतन जिल्ह्यातील ५॰ टक्के शाळांना मिळालेले आहे. उर्वरित शाळांमधील कर्मचारी हे सप्टेंबर आणि आॅक्टोबरच्या वेतनापासून अद्याप वंचितच आहेत. याउलट शेजारील सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील कर्मचाऽयांना दोन्ही महिन्यांचा पगार एकदाच मिळाला आहे. या व्यवस्थेत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे संबंधित अधिकाऽयांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
परभणी जिल्हाचा झाला .
ReplyDeleteमुंबई ठाणे मध्ये झाला नाही
ReplyDelete