मुंबईतील तिघांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ५९ वे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आदर्श शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऽया मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले. मुंबईतील तीन शाळांच्या मुख्याध्यापकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यातील शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्याध्यापक महासंघाचे प्रत्येकवर्षी अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते यंदाचे ५९ वे राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन सोलापूर येथे सुरू जाले आहे. शनिवारी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने सुधारित मूल्यमापन योजना आणि जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाने नवीन शैक्षणिक धोरण २॰१९ हे दोन शोध निबंध सादर केले. त्याचप्रमाणे शिक्षण संचालक दिनकर पाटील, राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे, शिक्षणतज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींनी या अधिवेशानात आलेल्या नागरीकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर या कार्यक्रमात आदर्श मुख्याध्यापकांना पुरस्कार देण्यात आले. आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार उत्तर मुंबई विभागातील चेंबूर हायस्कूलचे मुख्याध्यापक सदानंद परब, धारावीमधील छत्रपती शिवाजीराजे भोसले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विणा दोनवलकर आणि पश्चिम मुंबईतील वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यक बळवंतराव शिंदे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.


Comments