टीईटी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर



राज्य्भरातील शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण
मुंबई
प्रतिनिधी
राज्य्भरातील सर्व अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा सक्तीची करण्यात आली असून याचे वेळापत्रक गुरुवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने जाहिर करण्यात आले. आजपासून या टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुण देण्यात आले आहे ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा 19जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
राज्य्भरातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी केंद्र सरकारच्यावतीने टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. शिक्षक उमेदवारांना या परीक्षेत पास झाल्यानंतर त्यांना नियुक्ति मिळते इ. 1 ली ते इ. 5 वी आणि इ. 6 ते इ. 8 वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विना अनुदानित, कायमविना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या htpps://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षाशुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आज  ८ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु होत असून २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
Google ads 
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2019 वेळापत्रक
अ.क्र.
कार्यवाहीचा टप्पा
दिनांक व कालावधी
1
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी
08/11/2019 ते 28/11/2019
2
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे
04/01/2020 ते 19/01/2020
3
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक व वेळ
19/01/2020 वेळ स.10.30 ते दु.13.00
4
शिक्षक पात्रता परीक्षा-II दिनांक व वेळ
19/01/2020 वेळ दु.14.00 ते सायं.16.30

Comments

  1. फक्त पूर्व परीक्षा घ्या, आणि बेकारी तशीच वाढू द्या,

    ReplyDelete
  2. Agodrche result che kay?
    Ata tri nyaypalika milel kay?

    ReplyDelete
  3. काहीतरी प्रक्रिया सुरू आहे, माणसाने आशावादी असावे

    ReplyDelete

Post a Comment