शिक्षण विभागाकडून संचमान्यतेला स्थगिती


संस्थाचालकांना विद्यार्थी वाढविण्याची दिली संधी
प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येमध्ये दरवर्षी होणाऽया वाढीमुळे शिक्षकांचे समायोजन करणे शक्य होत नसल्यामुळे तसेच संस्थाचालकांना विद्यार्थ्यांची संख्या वाढ करण्यासाठी एक संधी म्हणून शैक्षणिक वर्ष २॰१९-२॰ च्या संचमान्यतेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आले आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या त्या आधारावर शिक्षकांची नेमणून करण्यात येते. त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाच्यावतीने संचमान्यता तयार करण्यात आली आहे. या संचमान्यतानुसार राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. त्याचप्रमाणे ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे किंवा संख्या कमी जाली आहे. त्याठिकाणी शिक्षकांची नेमणूक करणे किंवा शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे हे या संचमान्यतेनुसार ठरविण्यात येते. शिक्षण विभागाच्यावतीने लागू करण्यात येणाऽया संचमान्यतेमध्ये अनेक त्रुटी असून या संचमान्यतेमुळे शिक्षकांना मोठा नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे कला, क्रीड शिक्षक या संचमान्यतेनुसार दिले जात नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचा नुकसान होणार होते. म्हणून या संचमान्यतेला शिक्षक संघटनेच्यावतीने विरोध करण्यात आले होते. ही संचमान्यता स्थगित करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेच्यावतीने आशिष शेलार यांना निवेदन देण्यात आले होते. संचमान्यतेतील त्रुटी जोपर्यंत दुरुस्ती होत नाहीत, तोपर्यंत नवीन संचमान्यता लागू करु नये. तसेच मुलांची संख्या वाढवण्यास  एक संधी द्यावी यासारख्या अनेक मागण्या शिक्षणमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. यावेळी शिक्षणमंत्र्यानी सकारात्मक भूमिका घेऊ असे सांगितले होते. की, संबंधित अधिकाऽयांना सांगून  संचमान्यतेत सुधार होईपर्यंत तात्पुरती जुन्या संचमान्यतेच्या निकषांना स्थगिती दिली. आता जुन्या निकषांप्रमाणे सन २॰१९ - २॰२॰ ची संचमान्यता लागू होणार नाही. विद्यार्थी संख्या वाढवण्यास यावर्षी संधी मिळाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या सचंमान्यतेला स्थगिती असल्याने कोणीही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे शिवनाथ दराडे यावेळी म्हणाले.

Comments