शिक्षण
विभागात नेमलेले 33 अभ्यास गट रद्द
बाळासाहेब
थोरात
नागपूर, दि. 18 : राज्यातील शाळांना प्रतीविद्यार्थी वेतन अनुदान
देण्याचा व इतर मुद्यांबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नेमलेले विविध 33
अभ्यास गट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात
यांनी विधानपरिषदेत केली. विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी
मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. थोरात यांनी ही घोषणा केली.
थोरात म्हणाले, राज्यातील टप्पा अनुदानावर
असलेल्या तसेच विना अनुदानित शाळा/तुकड्या/अतिरिक्त शाखांना अनुदान धोरणामध्ये
सुधारणेसाठी विचार करून धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी हे 33
अभ्यास गट नेमले होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, शिक्षक वेतनाऐवजी प्रती विद्यार्थी अनुदान आदी बाबींचा यामध्ये अभ्यास
करण्यात येणार होता. मात्र, यासंदर्भात
शिक्षकांची तसेच लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन हे अभ्यास गट रद्द करण्यात येत
आहेत.
Nice work
ReplyDelete