प्राथमिक शाळेत आता बीएड शिक्षक शिकविणार



राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) सूचनेनंतर त्याबाबतची दुरुस्ती राज्यस्तरावर करण्यात येणार

मुंबई
प्रतिनिधी
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्याप्रमाणात रिक्त असतांना बीएड शिक्षकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) वतीने मोठा निर्णय घेण्यात आले आहे, त्यानुसार राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये बीएड धारक शिक्षकांची नेमणूक करण्याची सूचना एनसिटीईच्यावतीने देण्यात आले आहे. या सुचनामुळे राज्यातील हजारो बीएड धारकांना आपली हक्काची नोकरी मिळणार आहे

राज्यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नेमणुका करण्यावरून पात्रतेचे निकष ठरलेले आहे. प्राथमिकस्तरावर 'डीटीएड' अभ्यासक्रमाच्याच उमेदवारांना संधी देण्यात येते. 'बीएड' पदवीधारकांना त्यासाठी पात्र धरले जात नव्हते. काही वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाची घसरण लक्षात घेत, दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेने विविध बदल केले. यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत 'बीएड' पात्रताधारकाला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी देण्याबाबतचा विषय चर्चेत होता. असे बदल करण्याबाबत २०१८मध्ये 'एनसीटीई'ने विविध राज्यांना सूचना दिल्या. प्राथमिकस्तरावर शिकविण्याचा अधिकार कोणाला यावरून होणारे दावे-प्रतिदाव्यांमुळे राज्यस्तरावरून त्याचा निर्णय होत नव्हता. अखेर त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेत 'बीएड' पात्रताधारकांची नियुक्ती करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्याबाबत दुरुस्तीची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. त्यानुसार आता बीएडधारकांचा प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सहा महिन्यांचा अभ्यासक्रम

'बीएड'धारकांना प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्यासाठी सहा महिन्यांचा 'ब्रीज कोर्स' पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची रचना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने केलेली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच संबंधिताला प्राथमिक शिक्षक म्हणून संधी मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सहा महिने कालावधीच्या या 'कोर्स'मध्ये बाल मानसशास्त्रावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित उमेदवाराला प्राथमिक शिक्षक म्हणून काम करता येणार आहे.


प्राथमिक शाळेत 'बीएड' पात्रताधारकांची होणार नियुक्ती चांगली बाब आहे, परंतु त्यासाठी त्यांना 'ब्रीज कोर्स' पूर्ण करावा लागेल. तो अतिशय उत्तम स्वरुपाचा आहे. निश्चित त्यामुळे गुणवत्ता वाढू शकतो. वर्षभरापूर्वी परिषदेने सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे लक्ष होते. त्यानुसार हे बदल केले आहेत

Comments

  1. निर्णय खूप चांगला पण अंमल बजावणी कधी आणि केव्हा?ती करताना नियुक्तीची दिनांक ग्राहय धरणार का?याशिवाय सगळे शिक्षक हे एकच वर्गात समाविष्ट झाले तर D.ed B.edहा भेद राहणार नाही.जे शिक्षक प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये गेले आहेत त्यांची प्राथमिक ची सेवा ग्राह्य धरणार काव?शिवाय ब्रिज कोर्स करणे त्यांना बंधनकारक आहे का?

    ReplyDelete
  2. उत्तम निर्णय....

    ReplyDelete
  3. छान अहे. पण ६ ७ ८ ९ १० बराेबर हाेता.




    ReplyDelete
  4. निर्णय उत्तम आहे परंतु तात्काळ कार्यवाही व्हावी अपेक्षा आहे

    ReplyDelete
  5. Yacha Old Year 2002 madhe Marathi Geography ya Subject Madhun Bed kelelya Bed Teacherscha samavesh ahe ka.

    ReplyDelete

Post a Comment