मराठी शाळांसाठी मुंबई शहरातले पालक एकवटले


आर एम भट शाळेत होणार दोन दिवसीय संमेलन
प्रतिनिधी
मुंबई
इंग्रजी शाळांचे वाढते जाळे यामुळे मराठी भाषेच्या शाळांकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभावामुळे मराठी शाळा जलद गतीने बंद होत आहे. त्यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी आणि सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांना संजिवनी देण्यासाठी मराठी पालकांनी एकत्र येण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा एक भाग म्हणून परळ येथील आर. एम. भट शाळेत दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ आणि १५ डिसेंबर रोजी होणाऽया या संमेलनामध्ये विविध विषय हाताळण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मराठी भाषा केंद्रच्यावतीने करण्यात आली.
  मराठी शाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने ह्णमराठीप्रेमी पालक महासंमेलनह्य या उपक्रमाची सुरुवात जाली आहे. संमेलनाचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदा मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी संस्था, शाळांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी परळ येथील आर. एम. भट हायस्कूल येथे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
 या महासंमेलनाचे महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते जागर फेरीचे उद्घाटन होणार आहे. तर मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होणार असून ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत आणि मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास असणाऽया ह्णमराठी शाळांच्या सदिच्छादूतह्य अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीचे कायर्वाह आणि डायरेक्टर जनरल मा. डॉ. एम. एस. गोसावी हे उद्घाटन सोहळद्घाचे अध्यक्ष आहेत.

Comments

  1. मराठी शाळा टिकवण्यासाठी सदर उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.मातॢभाषेतून शिक्षण घेतल्याने शंकांचे वेळीच निरसन होते व ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.
    कार्यरत संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment