शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणार




 शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा
नागपूर, दि. 20 : राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पुर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.दत्रातय सावंत यांनी मांडली.
यावेळी श्री.थोरात म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना स्वत:साठी अथवा आपल्या कुटुंबियासाठी आरोग्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या 27 आकस्मिक व 5 गंभीर आजारावरील उपचारार्थ आंतरुग्ण कालावधी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येते. ही खर्च प्रतिपूर्ती आता कॅशलेस स्वरुपात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे.
या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.रणजीत पाटील, श्रीकांत देशपांडे, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

Comments

  1. सर्वात महत्त्वाची मागणी केली याबद्दल सावंत सरांचे मनस्वी आभार !

    ReplyDelete
  2. धन्यवाद..परमेश्वर आपणांस योजना लवकर लागु करण्यासाठी शक्ती देवो.

    ReplyDelete
  3. Aadhi anudanach kay te sanga Rao nnatr hoil cashlesss

    ReplyDelete
  4. कॅशलेस आरोग्य योजना तो शिक्षक जिवंत असे पर्यन्त त्यास लागू असली पाहीजे.
    कारण त्याची खरी गरज निव्रुती नंतर असते.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी १०० % बरोबर ..... सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ही योजना लागू राहणे गरजेचेच आहे. चांगला निर्णय लवकर अंमलबजावणी व्हावी...

      Delete
    2. आमचे सरकार आमचे साहेब

      Delete
    3. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्तिनंतर ही योजना लागू राहणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आघाडी सरकार लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

      Delete
    4. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्तिनंतर ही योजना लागू राहणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आघाडी सरकार लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

      Delete
  5. सर जरा उच्च माध्यमिक च्या अनुदानाचा सुद्धा विचार करा , आणि आपण तो कराल

    ReplyDelete
  6. हा एक चांगला निर्णय असेल हा ईतिहासीक निर्णय असेल

    ReplyDelete
  7. Good initiative...
    Plan to cover all citizens...

    ReplyDelete
  8. खूप चांगला सर्वांच्या हिताचा योग्य निर्णय .

    ReplyDelete
  9. खरंच लागू होईल का हा निर्णय?
    कारण मागील ५ वर्षात तावडे कडून काही लागू झाला नाही म्हणून शंका वाटते.

    ReplyDelete
  10. माननीय श्री विनोदजी तावडे यांनी पण हीच घोषणा मागील 5 वर्षांपूर्वी केली होती पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती ती या शासनाने करावी हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  11. खरंच अत्यावश्यक व महत्वाचा निर्णय आहे

    ReplyDelete
  12. साहेब आपल्या कामाची सुरुवात खूप छान आहे.शैक्षणिक क्षेत्रात आपल्या काळात चांगले निर्णय पूर्ण होवोत हीच सदिच्छा..

    ReplyDelete
  13. शिक्षकांचा विचार होतोय तर
    देवा सुदबुद्धि द्यावी

    ReplyDelete
  14. साहेब आपल्या कामाची सुरुवात खूप छान आहे.शैक्षणिक क्षेत्रात आपल्या काळात चांगले निर्णय पूर्ण होवोत हीच सदिच्छा..

    ReplyDelete
  15. साहेब आपल्या कामाची सुरुवात खूप छान आहे.शैक्षणिक क्षेत्रात आपल्या काळात चांगले निर्णय पूर्ण होवोत हीच सदिच्छा..

    ReplyDelete
  16. विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान दिल्यानंतरच ही योजना लागू करा.एक तुपाशी आणि एक उपाशी असे करू नये हीच अपेक्षा
    -एक विनाअनुदानित शिक्षक

    ReplyDelete
  17. शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांना जास्त गरज आहे

    ReplyDelete
  18. हे काम होणे खूप गरजेचे आहे, आपल्याला शासनाचीच कॅशलेस योजना चांगले आहे

    ReplyDelete
  19. छान निर्णय घेतला, धन्यवाद

    ReplyDelete
  20. छान👌👌
    निर्णय लवकरच अमलात आणावा.

    ReplyDelete
  21. धन्यवाद सर

    ReplyDelete
  22. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वंचित राहणार नाही ना.......??????

    ReplyDelete
  23. खूप चांगला निर्णय

    ReplyDelete
  24. ढोले एक चांगला निर्णय जि प शिक्षकांना पण सोबतीला घ्या कृपया सोडू नका हे सरकार दिर्घयुषी होवो

    ReplyDelete
  25. ज्यांना आज अखेर एकही रुपया पगार नाही ,अशा विना अनुदानित शाळांकडे ही लक्ष द्यावे ,ही आग्रा ची विनंती. प्रत्येक सरकार जो जेवतो आहे त्यालाच जेवण वाढते आहे पण विना अनुदानित शाळेतील उपाशी पोटी काम करणाऱ्या लोकांच्या कडेही लक्ष द्यावे, ही विनंती.
    विना अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारा सर हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे तो सर्व शिक्षक नेत्यांनी व मंत्र्यांनी पाहवा ,म्हणजे त्यांच्या अडचणी समजतील.

    ReplyDelete
  26. धन्यवाद थोरात साहेब ....

    ReplyDelete
  27. धन्यवाद साहेब आपल्या या निर्णयामुळे असंख्य शिक्षक बांधवाना मेडिकल बिलासाठी जो त्रास सहन करावा लागतो त्यातून मुक्तता मिळेल साहेब घोषणा नकॊ अंमल बजावणी आवश्यक आहे

    ReplyDelete
  28. धन्यवाद... ही योजना लागू होणे काळाची गरज आहे. अनेक शिक्षक कुटुंबे सुखी होतील. मधल्या मध्ये होणारा पैसाचा अपव्यय टाळता येईल.
    सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ही योजना लागू राहणे गरजेचेच आहे. चांगला निर्णय लवकर अंमलबजावणी व्हावी...

    ReplyDelete
  29. Thank you so much Sir. It is very nice Plan for Teachers.

    ReplyDelete
  30. लागू झाल्यावर च खरे

    ReplyDelete
  31. ही तर खरी गरज आहे.

    ReplyDelete
  32. घोषणा तर गेल्या 5 वर्षांपासून ऐकतोय अपेक्षा आहे ती त्वरित अंमलबजावणीची! ��

    ReplyDelete
  33. 1नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.

    ReplyDelete
  34. महाराष्ट्रा च्या राजकारणातील राजहंस आदरणीय बाळासाहेब थोरात.यांचे खुप खुप आभार

    ReplyDelete
  35. गुंतागुंतीची पद्धत होती म्हणून मी ३० वर्षात एकही मेडिकल बील घेतले नाही . खूप चांगला निर्णय . धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  36. धन्यवाद लवकरात लवकर ही योजना सुरु झालि पाहिजे मागील सरकारने सुद्धा अशा घोषणा केल्या होत्या पण ते सुरू करू शकले नाही .

    ReplyDelete
  37. लवकर अंमलात आणावी.
    ज्युनिअर कालेज ला अजून अनुदान मिळाले नाही.त्याची आघी सोय करावी.

    ReplyDelete
  38. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्य। सर्व कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करावी व जी घोषणा केली आहे ती लवकर लागू करावं

    ReplyDelete
  39. बोलणे सोपे करणे अवघड

    ReplyDelete

Post a Comment