शिक्षण उपसंचालक कार्यालयाची परवानगी आवश्यक
प्रतिनिधी
मुंबई
आरटीई कायद्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुर्तीण शिक्षकांचे सेवा समाप्तीचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून देण्यात आले होते मात्र टीईटी अनुर्तीण शिक्षकांवर कारवाई करतांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. हे निर्णय खासगी शाळेतील शिक्षकांनादेखील बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालक द गो. जगताप यांनी सांगितले आहे.
राज्यातील शाळांमध्ये २॰१३ नंतर नियुक्त जालेल्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आली असून टीईटी अनुर्तीण शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकानी दिले होते. या आदेशानंतर शिक्षक आमदार नागो गाणार यांनी विभागीय कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान शिक्षण संचालकाच्या आदेशाचे संदर्भ दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या या आदेशाचा चुकीचा अर्थ शिक्षण संस्थेच्यावतीने काढण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार शिक्षण संचालकानी स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार खासगी शाळांना नवे आदेश दिले. त्यात म्हटले आहे की, शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यवसायिक पात्रतेबाबत शहानिशा करुन सेवा समाप्तीचे बोलणे पारीत करावे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे आदेशानुसारच संबधीत संस्थेने शैक्षणिक पात्रता नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबत कारवाई करावी. परस्पर कोणतेही आदेश घेण्यात येऊ नये. शिक्षण उपसंचालक कार्यालयानी त्यांच्या स्तरावर ही गोष्ट कळवावी असे आदेश शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी दिले आहे.

Comments
Post a Comment