मुंबईतील शाळांचा अनुदानाचा मार्ग मोकळा


२॰ टक्के अनुदानासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात लगबग
प्रतिनिधी
मुंबई
शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील खासगी शाळांना २॰ टक्के अनुदान देण्याचे निर्णय घेतले असून निकषास पात्र ठरणाऽया शाळांची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्यावतीने मागविण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील ६८ शाळांना अनुदान देण्याचे काम शिक्षण उपसंचालक विभागाने हाती घेतले असून त्या शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या शाळांचा अनुदानाचा मार्ग मोकळा जाला आहे.
खासगी शाळा नियमितपणे सुरु रहाव्यात यासाठी संस्था चालकांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने निकषास पात्र ठरणाऽया शाळांना २॰ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनुदानास पात्र ठरणाऽया शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी मुंबई विभागीय शिक्षण विभागाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेनुसार आठवडाभर केवळ शाळांच्या अनुदानाच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबई विभागातील रायगड मध्ये अनुदानासाठी २४ शाळा पात्र आहेत. तसेच ठाणे विभागात २७, पालघरमध्ये ५, पश्चिम मुंबईत २, उत्तर मुंबईत ९, दक्षिण मुंबईत १ शाळा अनुदानासाठी पात्र आहेत. या शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी शिक्षण विभागाच्या निकषानुसार करण्यात येत आहे. या शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार असून संबधीतांना त्वरीत कशा पध्दतीने अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक भास्करराव बाबर यांनी सांगितले.

Comments

  1. पुणे विभागातील शाळेचं काय?

    ReplyDelete

Post a Comment