शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावे

 
देशात होणाऽया आंदोलनाच्या पाश्र्वभूमिवर बालहक्क आयोगाचे आदेश
प्रतिनिधी
मुंबई
नागरीकत्व सुधारणा विधेयकांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशभरात आंदोलने पेटली असून या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे आदेश महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीने देण्यात आली आहे. यापाश्र्वभूमिवर शाळांच्या परीसरात आंदोलना परवानगी न देण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
ेदेशभरात नागरीकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरातील मुस्लिम संघटनांनी रान पेटविले असून ही आंदोलने हिंसक होतात. अनेकवेळा दगडफेक आणि गाड्या जाळण्यात येतात. त्यामुळे देशभरात अशांततेचा वातावरण पसरले आहे. या पाश्र्वभूमिवर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीने शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आंदोलनानंतर होणाऽया हिंसेमध्ये विद्यार्थ्यांचे बरेवाईट होऊ नये यासाठी शाळांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत आयोगाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा परीषदेचे कायर्कारी अधीकारी, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक, शिक्षण संचालक यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये असणाऽया शाळांच्या परीसरात नागरीकत्व कायद्याविरोधात काढण्यात येणाऽया आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी सरकारकडे करण्यात येत आहे.

Comments