राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परीषदेने केली घोषणा ; सहा महिण्याचा कोर्स
प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये बीएड धारक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना सहा महिण्याचा ब्रीज कोर्स करावा लागणार असल्याचे सुचना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परीषदेच्यावतीने देण्यात आली आहे. बीएड धारकांना शिक्षक म्हणून रुजु होण्यासाठी या कोर्सची सक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी परीषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बीएड धारकांना आणखी एका नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
बीएडधारकांना प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्यासाठी सहा महिन्यांचा ब्रीज कोर्स पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची रचना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने केलेली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच संबंधिताला प्राथमिक शिक्षक म्हणून संधी मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सहा महिने कालावधीच्या या कोर्समध्ये बाल मानसशास्त्रावर आधारित अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित उमेदवाराला प्राथमिक शिक्षक म्हणून काम करता येणार आहे. प्राथमिक शाळेत बीएड पात्रताधारकांची होणार नियुक्ती चांगली बाब आहे, परंतु त्यासाठी त्यांना ब्रीज कोर्स पूर्ण करावा लागेल. तो अतिशय उत्तम स्वरुपाचा आहे. निश्चित त्यामुळे गुणवत्ता वाढू शकते. वर्षभरापूर्वी परिषदेने सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे लक्ष होते. त्यानुसार हे बदल केले आहेत. आता बीएड धारक हे कोर्स पूर्ण करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Comments
Post a Comment