दहावीचे पेपर तपासणाऽया शिक्षकांचा सवाल ; शिक्षकांवर असणाऽया ताणबाबत दुर्लक्ष कशाला?
प्रतिनिधी
मुंबई
दहावीच्या पेपर तपासणीमध्ये होणाऽया चुकांसाठी बोर्डाकडून केवळ शिक्षकांना जबाबदार ठरविण्यात आले होते. मात्र, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर यांना या चुकांसाठी जबाबदार का धरण्यात येत नाही, असा सवाल टिचर्स डेमोक्रेटीक फ्रंट या संघटनेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पेपर तपासणीतील चुकांसाठी मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटरदेखील जबाबदार असल्याचे यावेळी स्पष्ट जाले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतात. या परीक्षा जाल्यानंतर राज्यातील शिक्षकांना पेपर तपासणीचे काम देण्यात येते. दहावीचे पेपर तपासून जाल्यानंतर ते बरोबर तपासण्यात आले की नाही हे पाहण्यासाठी मॉडरेटर आणि त्यानंतर चिफ मॉडरेटर यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. काही दिवसांआधी बोर्डाच्या मुंबई विभागाकडून जालेल्या बैठकीत पेपर तपासणीमध्ये होणाऽया चुकांसाठी शिक्षकांना जबाबदार ठरविण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण जाले होते. पेपर योग्य तपासले की नाही ही पाहण्याची जबाबदारी मॉडरेटरची आणि मॉडरेटरने योग्य पेपर तपासले की नाही हे पाहण्याचे काम चीफ मॉडरेटरचे असते. मात्र, त्यांना यावेळी कोणताही दोष देण्यात आला नाही. केवळ शिक्षकांनाच यासाठी जबाबदार धरण्यात आल्याची प्रतिक्रिया शिक्षकांकडून देण्यात येत आहे.
यासंदर्भात टिचर्स डेमोक्रेटीक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया म्हणाले की, शिक्षकांना ८ दिवसात दोनशे ते तीनशे पेपर तपासायचे असतात. शिक्षकांना ७ ते ८ तास यासाठी बसून पेपर तपासायचे असतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. त्यामुळे बोडार्ने कमी पेपर तपासणीसाठी द्यावेत. पेपर तपासणीसाठी १२ ते १५ दिवस देण्यात यावे. पेपर तपासण्याचे मानधन दुप्पट करावे. पेपर तपासणी दरम्यान इतर कामे देऊ नये अशी मागणी पंडया यांनी केली. त्याचप्रमाणे पेपर तपासणीत होणाऽया चुकांसाठी केवळ शिक्षक जबाबदार ठरविणे योग्य नसल्याचे पंडया यावेळी म्हणाले.
बरोबर आहे
ReplyDelete