अनुदानीत शाळांचा दर्जा तपासा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना, शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उभारा
 
मुंबई, दि. 14 : शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केल्या. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये 'व्हर्च्युअल क्लासरुम' उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री  बोलत होते.

शिक्षकांनी मुख्यत्वे शिकविण्याचे काम करावे
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगवर भर देत असताना राज्यातील वंचित व दुर्गम शाळांसाठी 'व्हर्च्युअल क्लासरूम' अत्यंत महत्वाचे ठरतील. 'व्हर्च्युअल क्लासरूम' यंत्रणेमध्ये फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवणार नाही तर दोन्ही बाजूंनी संवाद होण्यास मदत होईल.शिक्षण हा राज्य सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्‍त कामांचा बोजा पडणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी  संबंधित विभागाला यावेळी केल्या.

ई- लर्निंगवर विभागाने अधिकाधिक भर द्यावा
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे व काळानुरूप शिक्षणाची कास धरावी या उद्देशाने ई लर्निंगवर भर देत असताना विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आठवी, नववी आणि दहावीचा अभ्यासक्रम देता आला तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होईल. विज्ञान विषय ॲनिमेशन स्वरुपात आणि गणित विषय अधिक सोप्या पध्दतीने मांडण्यात आला तर या दोन विषयांबद्दल विद्यार्थ्यांना वाटणारी भीती नक्कीच कमी होईल. ई लर्निंगचा आणखी एक फायदा होईल तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होईल. त्यामुळे र्व्हच्युअल क्लासरुमबरोबरच ई लर्निंगवर विभागाने अधिकाधिक भर द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.

स्कूल बसची सुरक्षितता
शिक्षण क्षेत्रात शासनाबरोबर काम करण्याची उद्योजकांनी सहमती दाखविल्याने शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमात या उद्योजकांची मदत कशी घेता येईल याबाबतही नियोजन करण्यात यावे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, शाळेत येण्या जाण्यासाठी असलेल्या स्कूल बसची सुरक्षितता हे शाळांनी तपासून घेणेही आवश्यक असल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, शिक्षण व क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

  1. अनुदान कधी देणार आहात साहेब उपाशीपोटी कस शिकवायच?

    ReplyDelete
  2. साहेबांना विनंती उपाशी पोटी असलेल्या शिक्षकांचा प्रश्न सोडवा एवढीच विनंती .

    ReplyDelete
  3. विनाअनुदानित शिक्षकांच्या पोटातच नाही तर ओठात कसे येईल साहेब

    ReplyDelete
  4. साहेब अनुदान कधी देणार

    ReplyDelete
  5. अनुदानाच काय मुख्यमंत्री साहेब अस किती दिवस चालणार सरकार बदलणार पण आमचा विचार कोण करणार आम्ही आमचे ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणेच करतोय पण आम्हालाही पोट आहे

    ReplyDelete

  6. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा विद्यार्थ्यांचे आपोआप सुटतील

    ReplyDelete
  7. मुख्यमंत्री साहेब सर्वात अगोदरउपाशीपोटी शिकवणाऱ्या शिक्षकांनाअनुदान द्या,व नंतर चालुद्या,जे अगोदरच्या सरकारने केले ते तुम्ही करू नका विनाअनुदानित कलंक पुसून टाका, एक 10वर्ष बिन पगारी शिक्षक

    ReplyDelete
  8. साहेब तुम्हीच या मुख्यमंत्री पदावर बसावे ही च अपेक्सा होती कारण मराठी माणसांना कळेल की विनाअनुदानित शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र काम उपाशी पोटी करत आहे आमचं आणि आमच्या उपाशी तपासी लेकरांच्या आशीर्वाद लागेल हो साहेब मा,बाळासाहेबांच्या आशीर्वादाने साहेबाना सद्बुद्धी मिळावं जेणेकरून उपाशी विनाअनुदानित शिक्षकाचा घराची चूल पेटली जाईल आणि अश्रूंना आश्रय मिळेल

    ReplyDelete
  9. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे 20 वर्ष बिनपगारी शिक्षक काम करत आहेत याच शासनाने भान ठेवून काम करा

    ReplyDelete
  10. प्रचलित अनुदान सूत्र कधी लागू करणार साहेब फार अपेक्षा आहे साहेब

    ReplyDelete
  11. जुनी पेन्शन द्या

    ReplyDelete
  12. अनुदानाच काय मुख्यमंत्री साहेब अस किती दिवस चालणार सरकार बदलणार पण आमचा विचार कोण करणार आम्ही आमचे ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणेच करतोय पण आम्हालाही पोट आहे

    ReplyDelete
  13. 20% shalanna 100% anudan dya Saheb .

    ReplyDelete
  14. विनाअनुदानित शिक्षकांच्या पोटातच नाही तर ओठात कसे येईल साहेब

    ReplyDelete
  15. 2012/2013 नैसर्गिक तुकडी पात्र शाळा वरील शिक्षकांना अनुदान मंजूर केव्हा मिळेल मंत्रालय स्तरावर पात्र नैसर्गिक तुकडी आहे पण अनुदान नाही

    ReplyDelete
  16. खूप मोठ्या उत्साहात शिवशेना सरकार कडे विनाअनुदानित शिक्षक पाहत आहे अवो साहेब, तावडे प्रमाणे झुलवत ठेवु नका म्हणजे मिळवलं,

    ReplyDelete
  17. खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना बरेच संस्थाचालक व मुख्याध्यापक हे त्या शिक्षकाच्या मताप्रमाणे शिकवू देत नाहित. ते त्यांच्या शिकवण्यात अडथळे आणतात. तेथील कर्मचाऱ्यांना मासिक वर्गणी जमा करावी लागते त्यामुळे शिक्षकाचे शिकवण्यात मन कसे लागेल त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार त्यासाठी त्या शाळेवर सरकारचे लक्ष असावे.

    ReplyDelete
  18. साहेब शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करावी

    ReplyDelete
  19. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सहानुभूती रास्त आहे पण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांविषयी आपुलकी सूर्य केव्हा उजळेल?

    ReplyDelete
  20. शिक्षकांचा माहिती अहवाल व ईतर कागदपत्राचा बोझा कमी करा व शिक्षक भरती लवकर पुर्ण करा अन्यथा शिक्षणाचा दर्जा खुप खालावत आहे कागदावर प्रगती व वर्गात अधोगती अशी परिस्थिती आहे.

    ReplyDelete
  21. मी सत्र 2017-18अतिरिक्त शिक्षक असुन शिक्षणाधिकारी माध्य अकाेला यांनी मुळ आस्थापनेवर पाठविले नाही.मुद्दाम 1वर्षापासुन न्यायालयीन प्रकरण मला शाळा शिकविणयासाठी यात शासनाचेच नुकसान आहे..

    ReplyDelete
  22. मराठी शाळांना 100% अनुदान द्या.

    ReplyDelete

Post a Comment