दहावी - बारावीच्या परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार


शिक्षक समन्वयक संघाचा आजाद मैदानात आंदोलन
प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी - मार्च महिण्यात घेण्यात येणाऽया दहावी - बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक समन्वयक संघाच्यावतीने घेण्यात आले आहे. या शिक्षक समन्वयक संघाच्यावतीने आजाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून जोपर्यंत शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय संघाच्यावतीने घेण्यात आले आहे. त्यामुळे दहावी- बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचे संकट निमार्ण जाले आहे.
बोर्डाकडून परीक्षाचे वेळापत्रक जाहीर जाल्यानंतर शिक्षक संघटनादेखील आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची किंवा परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर करुन टाकतात. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागदेखील पुढाकार लवकर घेत नसल्याचे चित्र आतापर्यंत पाहाव्यास मिळाले आहे. आता नविन सरकार काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबईतील आजाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात जाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होतं नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. तसेच आगामी दहावी आणि बारावी परीक्षांवर आम्ही बहिष्कार घालत असून याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे. शिक्षकांची प्रामुख्याने शासन निर्णय १३ सप्टेंबर २॰१९ अनुव्य घोषित प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रचिलित नियमानुसार अनुदान देऊन तत्काळ निधी मंजूर करा अशी मागणी आहे. आंदोलनाला स्वाभिमानी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघ, मराठवाडा मुख्याध्यापक संघ, शिक्षण संघर्ष संघटना आशा अनेक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Comments

  1. बहिष्कार टाकलाच पाहिजे

    ReplyDelete
  2. पूर्ण पने Bahishkar ahe मागण्या मान्य होईपर्यंत

    ReplyDelete

Post a Comment