दहावीचे पेपर तपासताना चुका करु नका

बोडार्चे शिक्षकांना सुचना
प्रतिनिधी
मुंबई
दहावीचे पेपर तपासतांना शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन काम करावे आणि पेपरतपासणीमध्ये होणाऽया चुका टाळण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने शिक्षकांना दिले आहेत. बोर्डाच्या या आदेशामुळे पेपर तपासणी दरम्यान होणाऽया चुकांकडे शिक्षक आता विशेष लक्ष देऊन काम करणार आहे. त्यामुळे लवकर आणि अचुक निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऽया दहावीच्या परीक्षेनंतर जो निकाल जाहीर होतो. त्यानंतर बोर्डाकडे पेपर तपासण्यात चुका जाले असल्याच्या अनेक तक्रारी येतात. काहि वेळा एकूण गुण देण्यात शिक्षकांकडून चुका जाल्या असल्याच्या तक्रारीदेखील बोर्डाकडे येतात. त्यामुळे निकालानंतर बोर्डावर होणाऽया विविध आरोप कमी करण्यासाठी बोडार्ने खबरदारी घेतली आहे. दहावी बोर्डाच्या मुंबई विभागाच्यावतीने नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पेपर तपासणाऽया शिक्षकांकडून होणाऽया चुकांबाबत चर्चा करण्यात आली. एकूण मार्क चुकीचे देणे, उत्तराला कमी मार्क देणे किंवा प्रश्न न तपासणे अशा अनेक चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परीणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करण्यात येते. विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी बोडार्ने खबरदारी म्हणून पेपर तपासतांना होणाऽया चुका टाळण्याच्या सुचना शिक्षकांना दिल्या आहेत. पेपर तपासून जाल्यावर पुन्हा एकदा उत्तरपत्रिकेवर नजर फिरविण्याची सुचना यावेळी शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. या सर्व सुचनामुळे विद्यार्थ्यांचा एकूण निकाल योग्य लागणार असल्याचा दावा बोर्डाकडून करण्यात आला आहे.

Comments

  1. Moderater chi sankhya vadhva

    ReplyDelete
  2. Paper tapasni che payse pan wadwa ani paper tapasni che payment laokar kele tar bara hoin sir ji

    ReplyDelete
  3. Time aani checking che paise vadava

    ReplyDelete
  4. Very good step taken to make the examiners nd moderators conscious of their responsibility.
    Its imp.to allot the correction work to competent nd well-experienced examiners.
    Even the remuneration shud b on time nd even increased

    ReplyDelete
  5. Shikshkana shale kadun paper checking sathi special vel boarda kadun denyas sanga shala kadun relieve karnes sanga

    ReplyDelete
  6. Thanks for reminder msg. Aaj tak bhi hum ne in baato ka khayal rakha hai aage bhi rakhenge .Aap na bhi batate to hume pata hai k ye hamari duty hai aur hume apna kaam achche se karna hai

    ReplyDelete
  7. Paper check karnyasathi time give more

    ReplyDelete
  8. It's a teacher's role to assess the papers carefully and accurately

    ReplyDelete
  9. Increase the paper checking timing

    ReplyDelete

Post a Comment