शाळा बंद करायला अक्कल लागत नाही ; शरद पवार यांचा विनोद तावडेंना टोला ; शिक्षक भारतीचे अधिवेशन संपन्न

 शरद पवार यांचा विनोद तावडेंना टोला ; शिक्षक भारतीचे अधिवेशन संपन्न
प्रतिनिधी
मुंबई
महापुरुषांच्या महाराष्ट्रात १३ हजार शाळा बंद होतात हे महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला उध्दवस्त करण्याचा प्रकार असून शाळा बंद करायला अक्कल लागत नाही पण शाळा सुरु ठेवयाल अक्कल लागते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगावला. विनोद तावडे यांच्या काळात शिक्षक कसे अडचणीत आले होते याचे अनेक उदाहरण पवार यांनी यावेळी दिले. ते शनिवारी मुंबईत वडाळा येथील क्रीडा मंदीर मध्ये आयोजित शिक्षक भारतीच्या संघटनेच्या अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातील शिक्षकांनी हजेरी लावली.
यावेळी शरद पवार म्हणाले की, चुकीच्या प्रश्नावर गेल्यावर त्यांना वळणावर आणनायचे काम शिक्षिका करतात, त्यामुळे संजय राउत हे रोज नवनवीन कसे लिहितात,त्यांना कसे सुचते  हे आत्ता कळले.
माज्या आईचा आदर्श शाहू महाराज होते, त्यावेळी ती शाळा चालतात का हे पहायची. माजा जन्म जाला त्यावेळी त्या मीटिंगसाठी गेली होती, आमच्या घरात शिक्षणाला प्रचंड महत्त्व होते. त्यामुळे आमच्या घरात शिक्षण कसे होते हे पहिलीचां अभ्यासक्रम बदलून त्यात शरद कमळ बघ म्हणणाऽयांना कमळ कसे दिसेल. म्हणून सगळ्या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज आहे. मी आणि संजय राऊत आम्हाला प्रशासनाचा अधिकार नाही, पण आम्ही जे करायचे ते करू अशी ग्वाही यावेळी देतो. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या टिक करून द्या आम्ही ग्रामविकास, शिक्षणमंत्री यांना बोलवून घेऊन. ग्राम विकास मंत्री माजे ऐकतील त्यात
पण अजित दादा यांना मी सांगेन. मुख्यमंत्री हे राज्याच्या हिताचा विचार करणारे आहेत ते ही यावर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. शिक्षकांच्या ठराविक प्रश्नांवर निकाल लावण्याची गरज आहे. पाच वर्षाच्या राजवटीत मी शिक्षण मंर्त्र्यांच्या घरी गेलो होतो. शिक्षक आणि राज्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या घरी गेलो पण काही उपयोग जाला नाही. पुन्हा पुन्हा सांगून कळत नसेल तर धडा शिकवावा लागतो. म्हणून एकट्याने धडा न शिकवता आमची नजर संजय राऊत यांच्याकडे गेली आणि धडा शिकवला असे सांगताच सभागृहात जोरदार टाळ्यांचा आवाज जाला. शिक्षकांनी मांडलेल्या प्रश्नावर अनेकदा मला अर्थखात्याकडून हे शक्य नाही असे सांगण्यात यायचे. आम्ही त्या काळात बसून अनेक प्रश्न आम्ही सोडवले पण मागील पाच वर्षात संबंध वर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. राज्यात मी कुठेही जातो तिकडे जुन्या पेंशन योजना याचे निवेदन मला मिळतात. जे निर्णय जुन्या सरकारने घेतले त्यात सुधारणा करायची असते, परंतु ते बाद करायचे नसते आज शिक्षकाचे सार्वत्रिक करणं हे सूत्र असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे विविध विषय मांडले.

Comments

  1. अहो शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीवर काही बोलले का साहेब

    ReplyDelete
  2. सर, शिक्षण सेवकांचे मानधन कधी वाढेल

    ReplyDelete

  3. सर, शिक्षण सेवकांचे मानधन कधी वाढेल

    ReplyDelete
  4. बदली धोरण 27-2-2017चे धोरणातील 28-5-2019चे शुद्धिपत्रकशुद्धिपत्रकाछ ल सेवाजेष्ठने सेवाकनिष्ठ कडे जाण्याची अट रद्द व्हावी. पत्नी एकत्रीकरण विनाअट व्हावे

    ReplyDelete
  5. शिक्षणसेवक मानधन वाढवा हो साहेब म्हणा येथे 6000 रु 3 वर्ष कोणत्याहीराज्यात एवढ्या कमी मानधनावर शिक्षक काम करत नाही.

    ReplyDelete
  6. जुनी पेन्शन योजना लागू करा हो साहेब..

    ReplyDelete
  7. पेंशन महत्त्वाची आहे ...

    ReplyDelete
  8. खाजगी शाळांतील शिक्षकांना सरकारी पगार करा, मुलांकडून फी घेणे बंद करा,त्यांना अनुदान द्या,१०वी पर्यंत, सर्व देशांत अभ्यासक्रम समान करा, व्यावसायिक शिक्षण सुरू करा,शिक्षण
    क्षेत्रातील नफेखोरी बंद करा,इ.योग्य अटीवर नवीन शाळांना परवानगी द्या, किंवा पहिल्याच शाळा चालवायला द्या.

    ReplyDelete
  9. प्रचलीत धोरणपप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे का

    ReplyDelete
  10. शिक्षण सेवकांना पुर्ण वेतन द्या

    ReplyDelete
  11. एकच मिशन जुनी पेन्शन
    शिक्षण सेवक मानधन वाढ झालीच पाहिजे
    तुकड्यांना अनुदान मिळालेच पाहिजे
    इंग्रजी शाळा ची फी सरकारने ठरवले पाहिजे

    ReplyDelete
  12. एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन लागू करा नक्कीच पुढील सरकार सुदधा आपलेच सरकार

    ReplyDelete
  13. Dted pass वाल्यांना रिकामे ठेऊ नका. 25 विद्यार्थी एक शिक्षक असे नियम बनवा. सर्वांना शिक्षक बनवा.

    ReplyDelete
  14. शिक्षक फक्त स्वतःचे विचार करतात, दर्जेदार शिक्षण कसा मिळेल याचा कोण विचार करणार

    ReplyDelete
  15. शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रामाणिक काम करनार्याना सर्वाना वेतन द्यावे..

    ReplyDelete
  16. जुनी पेन्सन मिळाली पाहिजे

    ReplyDelete

Post a Comment