शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण
प्रतिनिधी
मुंबई
अहमदनगरचे प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची शिक्षकांची खिल्ली उडविणारी क्लीप व्हायरल जाली आहे. या क्लीमध्ये शिक्षक आपले ३५ मिनिटांचा तास कसा वाया घालवितात याबाबत इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट करुन दाखविले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. पुण्यातील लेखक तसेच प्राध्यापक नामदेव जाधव यांच्यानंतर इंदुरीकर महाराजांनी शिक्षकांचा चांगलाच क्लास घेतला आहे.
किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे मात्र आता दुहेरी अर्थ असलेले वाक्य वापरण्याचा नविन ट्रेंड किर्तनकारांमध्ये आल्याचे चित्र राज्यात आहे. यामध्ये आघाडीचे किर्तनकार म्हणजे इंदुरीकर महाराज. युट्युब आणि टिकटॉकमुळे प्रसिध्दी मिळविलेल्या इंदुरीकर महाराज सर्वांनाच माहिती आहे. या महाराजाचे किर्तन ऐक्ण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी असते. मात्र इंदुरीकर महाराज चार दिवसांपूर्वीच त्यांच्या किर्तनातलं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं. ओजरमध्ये जालेल्या किर्तनात ह्णसम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होतेह्य असे वक्तव्य केल होतं. त्यामुळे सोशल मिडीयामध्ये इंदुरीकर महाराजावर मोठी टिका करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल जाली आहे.
या क्लीपमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात की, शिक्षक ३५ मिनिटांच्या तासिकेत पाच मिनिटं तर शिक्षक वर्गात जाण्यासाठी घालवतात. त्यानंतर फळा पुसायला पाच मिनिटं घालवतात. आदल्या दिवशी काय जालं ते सांगायला आणखी पाच मिनिटं घेतात. उरलेल्या वेळात उद्याच्या तासाला काय शिकणार हे सांगायलाही पाच मिनिटं घेतात. त्यानंतर काय मग तास संपला हे सांगायचीच वेळ येते. असं म्हणत शिक्षक त्यांना शिकवण्याची तासिका आटोपती घेतात असं सांगत इंदुरीकर महाराजानी शिक्षकांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. इंदुरीकर महाराजानी शिक्षकांची खिल्ली उडविण्यापेक्षा समाजात प्रबोधनाचे काम करावे असा सल्ला शिक्षकांनी दिला आहे.
खरंच शिक्षक कुठे काय करतो!!! ..... आई कुठे काय करते हा प्रश्न विचारण्यासारखा आहे.
ReplyDeleteशिक्षणेतर कामे लादून शासन शिक्षकांची थट्टा आणि मुस्कटदाबी करत आहेत. आता समाज प्रबोधन करणारे ... कोणीही यावं व टपली मारून जावं .... हीच अवस्था आहे शिक्षकांची ....