माध्यमिक शाळेत
विद्यार्थी संख्या वाढल्यास काही अटींच्या अधिन
राहून अतिरिक्त शिक्षक
प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 28 : राज्यात माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या
वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत असल्यास असे वाढीव पद काही
अटींच्या अधिन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला उपलब्ध करुन देण्याबाबत
शिक्षक संचालकांना कळविले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
यांनी दिली.
राज्यात
माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न
सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना
प्रा.गायकवाड बोलत होत्या.
प्रा.गायकवाड
म्हणाल्या, राज्यात माध्यमिक शाळेत
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सदस्यांनी केलेल्या
सूचनांचा विचार करुन लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. राज्यात
माध्यमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे एखाद्या शाळेतील शिक्षकाचे पद वाढत
असल्यास असे वाढीव पद काही अटींच्या अधिन राहून अतिरिक्त शिक्षकासह त्या शाळेला
उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षक संचालक यांना 13 नोव्हेंबर 2018 च्या शासन
पत्रान्वये कळविण्यात आले असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
Comments
Post a Comment