सामान्य शिक्षकांसाठी कित्येक वर्षांनंतर ऑनलाईन बदलीचे धोरण आले.आणि वड्या-वस्ती वरच्या शिक्षकांना आपल्या स्वजिल्ह्यात जाण्याची संधी प्राप्त झाली.तो काळ खूप त्रास दायक होता जेंव्हा NOC साठी आणि अट शिथिल करण्यासाठी शाळा सोडून मंत्रालयाच्या चक्रा माराव्या लागत होत्या.NOC साठी,कार्यामुक्त होण्यासाठी आणि LPC साठी आमचा सामान्य शिक्षक,आर्थिक आगीच्या आगडोंबतून होरपळून निघायचा आणि केलेली दोन पैस्याची कमाई फक्त अंतरजिल्हा बदली साठी गमावून बसायचा.
शेवटी 2017 वर्ष आले अन सामान्य शिक्षकांच्या आनंदाला उधाण यायला लागले कारण ऑनलाईन बदली धोरणामुळे विना-पैसे,विना-मानसिक त्रास बदली होणार होती आणि घडले ही तसेच.त्यामुळेच ऑनलाईन आंतरजिल्हा बदली टप्पा1/2/3 पार पडला. टप्पा 4 साठी संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक उत्सुक आणि आनंदित असतांना मात्र काही संघटनांनी ऑनलाईन बदली धोरण जणू काही मोडीत काढूनच दाखवू असा घाट घातला आहे.ज्या संघटना कधी शिक्षण सेवक लागू करू नका असे म्हणायला पुढे आल्या नाही किंवा आमच्या शिक्षक बांधवाना नवीन पेंशन नको म्हणायला सरसावल्या नाहीत,परंतु ऑनलाईन बदली धोरण रद्द करणेसाठी जीवाचे रान करतांना दिसत आहेत.
*ऑनलाईन आंतरजिल्हा बदली धोरण एवढे चांगले आहे,त्याचे नुकसान कोणालाच होणार नाही,उलट पक्षी आपल्याच शिक्षक बांधवांचे आर्थिक लचके तोडले जाणार नाही.*
काही शिक्षक संघटनेला विनंती करतो की तुम्ही आमुचे माय-बाप आहात, तुम्ही आहात म्हणून शिक्षकांवर अन्याय होत नाही.परंतु ऑनलाईन बदली धोरण रद्द झाल्यास बदली ग्रस्तांना खलील त्रास सहन करावा लागेल...
1.NOC ला महत्व प्राप्त होईल,परिणामी पुन्हा:-बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया। असे होईल.
2.आंतरजिल्हा बदली नंतर कार्यामुक्त साठी एवढा पैसे जमा करून ठेवावा लागायचा जसे काही पोरीचा हुंडाच आहे का..?
3.बदली नंतर रुजू झाल्यानंतर पुन्हा शाळा घेण्यासाठी द्या अजून "हुंडा".
आता ऑनलाईन धोरणात मात्र बदली यादीत नाव आल्यास जिल्हा परिषद वाले जिल्ह्यातून कार्यमुक्त करणेसाठी मागे लागत होते.आणि जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर साहेब पसंतीची गाव देण्यास तयार असायचे.
*त्यामुळे हक्काची ऑनलाईन आंतरजिल्हा बदली आमची हिरावून घेऊ नका की राव..*
*आमची ऑनलाईन बदली होऊ द्या न राव...!*
एक बदली ग्रस्त शिक्षक...!
Comments
Post a Comment