माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची गवाही
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवीन महाविकास आघाडी सरकार राज्याच्या शिक्षणासाठी
काही करणार असेल तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा व सहकार्य राहील, असे वक्तव्य माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक
परिषदेच्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना केले. त्यावेळीच
सरकारकडून शैक्षणिक गुणवत्ता ढासळणारी आणि भ्रष्टाचार वाढविणारी पावले उचलली गेली तर
प्रखरपणे विरोध करावाच लागेल, असेही प्रतिपादन केले.
आम्ही कोणत्याही प्रकारचे शिक्षणाचे भगवीकरण केलेले नाही. शिक्षणतज्ञांनी सुचविलेल्या गोष्टी अभ्यासक्रमात आणल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची विस्तृत अधिकची माहिती सुध्दा मागच्या सरकारने इतिहासाच्या
पुस्तकात वाढविलेली आहे.
भाजपा सरकारच्या काळात शिक्षक आमदार कपिल पाटील व अन्य आग्रहाने करीत होते
त्या सर्व मागण्या नवीन सरकारकडून आ.कपिल पाटील पूर्ण करुन घेतील,
कारण त्यांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. शिक्षकांना
शाळाबाह्य कामाचा विषय देणे, मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच
समायोजन करणे, जुनी पेन्शन लागू करणे, 100 टक्के अनुदान देणे इत्यादी सर्व विषय या सरकारला पाठिंबा दिला असल्यामुळे त्यांच्याकडून
आ.पाटील करुन घेतील.
मागील भाजपा सरकारने शिक्षकांची नोकरभरती
ही भ्रष्टाचारविरहीत केली. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमधील
भ्रष्टाचार संपविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने बदल्या करण्यात आल्या. पण दुर्दैवाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचे
आताच्या ग्रामविकासमंत्र्यांनी घोषित केले असून बदल्यांमधील भ्रष्टाचार वाढविण्याचे
संकेतच दिले आहेत.
शिक्षक परिषदेच्या या अधिवेशनात मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर, भगवानराव साळुंखे, शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे इत्यादी
मान्यवर उपस्थित होते.

विनोदजी तुमचा गोधळ नडला आम्हाला आत्ता नमन नको किती राग आहे तुमचा कपिल पाटील वर 😂
ReplyDeleteWhat he did for drawing teachers? No new appointment,no upgradation, whats the use of having A.M.degree.Though there's vacancy we don't get upgradation
ReplyDeleteविनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना कोणीही वाली नाही.त्यांनी फक्त संस्थाचालकांची मनमानी सहन करायची.फार कमी पगारात मुकाट्याने काम करायचे.
ReplyDelete