दहावी - बारावीचे निकाल रखडणार


आता पर्यंत पेपर तपासणी सुरू नाही ; उत्तरपत्रिका धूळखात
मुंबई
प्रतिनिधी
राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदीचा थेट फटका दहावी - बारावीच्या निकालाला बसणार आहे, संचार बंदीमुळे शिक्षकांपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पोहोचल्याचा नसल्यामुळे यंदा निकाल विक्रमी रखडणार असल्याची माहिती मिळाली आहे
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ यांच्यावतीने राज्यात दहावी - बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यात येतात. मात्र राज्यात कोरोना व्हायरस पसरल्यामुळे दहावीच्या एक विषयाची परीक्षा रखडली आहे. त्याचप्रमाणे राज्यात संचार बंदी लागू असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्याची सुविधा नाही. त्यामुळे शाळांमध्ये बारावी आणि दहावीच्या उत्तरपत्रिका धूळखात पडल्या आहेत. 
दहावी - बारावीचे निकाल लवकर जाहीर व्हावे यासाठी उत्तरपत्रिका घरी घेऊन जावे असे आदेश बोर्डच्यावतीने शिषकांना देण्यात आली होती. मात्र संचार बंदी लागू झाल्यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शाळांमध्ये दहावी - बारावीच्या उत्तरपत्रिका धूळखात पडल्या आहे. बोर्डाने लवकरच आवशयक ते निर्णय घेतले नाही तर दहावी बारावीचे निकाल खूप रखडणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ यांनी व्यक्त केले आहे.
                              संचार बंदी नंतरच पेपर तपासणी
कोरोना व्हायरस मुळे राज्यात लागू करण्यात आलेली संचार बंदी संपल्यानंतर शिक्षकांनी उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी घेऊन जावे असे नवे निर्णय बोर्डाकडून घेण्यात आले आहे. ही संचार बंदी जेवढी लांबणीवर जाणार तेवढेच दहावी - बारावीचे निकाल रखडणार आहे 

Comments

  1. आणखी दहावीचा भूगोलाचा पेपर व्हायाचा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आजरोजी विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे,,,पेपर हा विषय नंतर,,,!जर लॉक डाउन वाढले तर पेपर न घेता शाळेतील सरावपरिक्षा गुण ग्राह्य धरण्यात यावे,,,! मुअ रामेश्वर तायडे शरद पवार हायस्कूल, भडगाव, बुलढाणा

      Delete

Post a Comment