एसईबीसी, ईडब्ल्युएस उमेदवारांना टीईटीत ५ टक्के सुट


महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचा निर्णय ; मराठा समाजाच्या उमेदवारांना दिलासा
प्रतिनिधी
मुंबई
शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक करण्यात आली असून या टीईटी परीक्षेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आणि आर्थिक दृष्टया दृबर्ल घटकांना (ईडब्ल्युएस) उर्तीण होण्यासाठी ५ टक्के सुट देण्यात आली आहे. यासंदभार्तील एक पत्र शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले. परीषदेच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्तीला टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली. २३ आॅगस्ट २॰१३ पासून ही परीक्षा बंधनकारक करण्यात आली असून त्यानंतर नियुक्त जालेल्या शिक्षकांना तीन मुदतीत ही टीईटी परीक्षा पास करायची आहे. १९ जानेवारी २॰२॰ रोजी राज्यभरात टीईटीची परीक्षा जाली. या परीक्षेत पास होण्यासाठी एसईबीसी आणि ईडब्ल्युएस प्रवगार्तील उमेदवारांना ५ टक्के गुणांची सुट देण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरतांना नाव, जात यामध्ये काही चुका जाल्या असतील त्यांना चुक दुरुस्त करण्याची मुदत देण्यात आली असून त्यांनी परीषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर भेट देऊन लॉगइन करुन उमेदवारांने आपले निवेदन सादर करायचे आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी २३ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे.




Comments