शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा ; नवीन तारीख ३१ मार्चनंतर जाहीर होणार
प्रतिनिधी
मुंबई
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून या व्हायरसची लागण विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा सोमवारी होणाऽया शेवटच्या पेपरची परीक्षा रद्द केली आहे. या पेपरची सुधारीत तारीख ३१ मार्चनंतर जाहीर होणार असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर दहावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू जाली असून २३ मार्च रोजी या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. या परीक्षेदरम्यान राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडण्यास सुरुवात जाली. रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ही परीक्षा घ्यावी की नाही असा विचार सुरू जाले. काही महत्त्वाचे पेपर जाल्यामुळे ही परीक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले. मात्र, कोरोनाची स्टेज ३ सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना त्याची लागण होऊ नये म्हणून २३ मार्च सोमवारी होणारा भूगोल-सामाजिक शास्त्र विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. सोमवारी होणाऽया पेपरच्या परीक्षेची तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर २॰ मार्च रोजी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली होती. यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर असा समावेश होता. मात्र, दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, आता राज्यातील परिस्थिती आणि कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जालेली वाढ पाहता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा उर्वरित एक पेपर पुढे ढकलला.
Comments
Post a Comment