राज्यातील मुख्याध्यापक संघटनेचा सवाल
प्रतिनिधी
मुंबई
राज्य शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषक आहार योजना शाळांमध्ये राबविण्यात येते मात्र कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद आहे. त्यामुळे शाळेतील शिल्लक धान्य विध्यार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आले होते . मात्र राज्यात संचार बंदी असल्यामुळे विध्यार्थ्यांना धान्य कसे वाटायचे असा सवाल राज्य मुख्याध्यापक संघाच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा विरोध मुख्याध्यापक संघाने केले आहे
राज्यात कोरोना व्हायरसमुळे संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा पुढील आदेश येई पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे राज्यातील विध्यार्थी पोषक आहारापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांकजे आरोग्य चांगले रहावे यासाठी राज्यातील शाळांमधील शिल्लक धान्य विध्यार्थ्यांना वितरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे विध्यार्थ्यांना दोन वेळचे पोषक आहार मिळणार होते मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राज्यात संचार बंदी मुळे नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. केंद्र सरकारने संचार बंदी लागू केल्यामुळे विध्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचप्रमाणे शाळेच्या जवळ राहणारे विद्यार्थी जरी शाळेत पोहोचले तरी त्यांना धान्य वाटण्यासाठी आणि त्यांना कोरोनापासून वाचविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आणि कर्मचारी नसल्याची खंत मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे. आम्ही धान्य वाटण्यास तयार आहे मात्र विध्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही धान्य कसे वाटायचे असा सवाल मुख्याध्यापक संघाने शिक्षण विभागाला केला आहे.
Comments
Post a Comment