मुंबई (शालेय वृत्तसेवा):
राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन पुणे प्राधिकार पत्राने (बीडीएस) काढण्याची परवानगी शालेय शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र आता राज्य शासनाने वेतन दोन टप्प्यात देण्याचे आदेश दिल्यामुळे पूर्वीच्या अादेश मागे घ्यावे लागल्याने राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडण्याची शक्यता शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात निधीअभावी मार्च महिन्याचे वेतन उशिरा होत असते. अशावेळी पुणे प्राधिकार पत्राचा वापर करून वेतन देण्याच्या सूचना अशा कोषागरांना केल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेतन वेळेवर होण्यासाठी सोपस्कार पूर्ण केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार दोन टप्प्यात होणार आहेत. राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार बिले 20 मार्च ला ट्रेझरी कडे जमा झाली होती. सादर केलेले पगार बिले ही शंभर टक्के वेतनानुसार काढलेली होती. वेतन विभागाचे बोलणे केल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली की शासन आदेशात नमूद टक्केवारीत पगार बिले काढावी लागणार आहेत. त्यामुळे जमा केलेले पगार बिले रद्द झाले आहे. पुन्हा नव्याने पगार बिले बनवावे लागणार आहेत. राज्यभरात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे मुख्याध्यापक व लिपिक हे बिल्ले बनू शकणार नाहीत. 14 एप्रिल नंतर जरी बिले बनवून पाठवले तरी पगार होण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवस आवश्यक आहेत. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार एप्रिलमध्ये होण्याची आशा धूसर झाली आहे असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेत्तर पगार लवकरच होण्यासाठी योग्य ते आदेश काढावेत अन्यथा या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर तातडीने तोडगा काढावा.
-जालिंदर सरोदे मुख्य कार्यवाह शिक्षक भारती
Comments
Post a Comment