दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द



नववी आणि अकरावीच्या विध्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले
मुंबई
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची परीक्षा घेण्यात येत असून कोरोना व्हायरच्या संचार बंदीमुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर रखडला आहे. निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी करण्यात येत असल्यामुळे दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे तसेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनादेखील परीक्षा न घेता त्यांना पुढ्या वर्गात पाठविण्यात आले असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केली.
राज्यात दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आली होती मात्र कोरोनाचे संकट वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चपासून संचार बंदी लागू केली त्यामुळे सोमवारी 23 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली भूगोल विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यात 14 एप्रिल रोजी संचार बंदी उठताच दहावी आणि इतर परीक्षा घेणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली मात्र कोरोना आजाराचे रुग्ण जलद गतीने राज्यात वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 30 एप्रिल पर्यंत संचार बंदी वाढवली. ही संचार बंदी वाढविल्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दहावीचा निकाल लवकर जाहीर करावा अशी मागणी शिक्षक आणि पालक संघटनांच्यावतीने करण्यात येत होती. त्यामुळे बोर्ड आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर दबाव वाढत होता. सर्व संघटना आणि पालकांकडून भूगोल विषयाची परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असल्यामुळे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी भूगोल विषयाची परीक्षा रद्द केली.

गुण देण्यासाठी समिती गठीत 
भूगोल विषयाची परीक्षा रद्द केली आहे मात्र या विषयाला गुण कसे देणार याबाबत प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असलेली शंका सध्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दूर केली आहे. परंतु अशा परिस्थितीत परीक्षा रद्द झाल्यावर गुण देण्याबाबत कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे याबाबत समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती कशा पद्धतीने गुण देता येतील याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

                                  नववी - अकरावीची मुले पुढच्या वर्गात
नववी आणि अकारवीच्या परीक्षा संचार बंदीमुळे रखडल्या होत्या. या परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील कर्मचारी वर्ग संचार बंदीमुळे शाळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ही परीक्षा होण्यास विक्रमी उशीर होणार होते त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेत आणि विद्यार्थ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावपासून बचावासाठी शिक्षणमंत्री यांनी नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविले. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सहामाही परिक्षामध्ये केलेली कामगिरी आणि प्रोजेक्ट तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित विविध उपक्रमात दाखवलेली कामगिरीवर त्यांना मार्क देण्यात येणार आहे

Comments