प्राथमिक शिक्षक संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि डॉक्टरांना विमा संरक्षण दिले आहे. शिक्षकांना शाळेत धान्य वाटपासाठी बोलविण्यात आल्यामुळे शिक्षकांनादेखील विमा संरक्षण योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यवतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन द्वारे करण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील विविध जबाबदारी अद्यापही पार पाडण्यासाठी त्यांना शाळेत जावे लागते त्यामुळे शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भावापा सून बचावसाठी राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र शाळेतील विविध जबाबदाऱ्या अद्यापही शिक्षकांकडे आहेत. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून पोषक आहार योजनेतील शिलल्क धान्य विद्यार्थ्यांना वाटण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन करण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत जावे लागणार आहे. शिक्षकदेखील इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे शिक्षकांनी विमा संरक्षण योजना लागु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बालकृष्ण तांबोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे
Comments
Post a Comment