शिक्षकांची ओळखपत्र योजना रखडली


संचार बंदित शाळेला जाण्यास अडचणी 
प्रतिनिधी 
मुंबई 
राज्य सरकारच्यावतीने शाळांमधील शिल्ल्क धान्य वाटण्यास निर्देश देण्यात आले आहे. मात्र काही शिक्षकांकडे ओळखपत्र नसल्यामुळे संचार बंदी मध्ये शाळेत येण्यास अडचणी येत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनी शिक्षकांना ओळखपत्र देण्याची मागणी मनसे शिक्षक सेनेच्यावतीने राज्य सरकारकारकडे करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई तर्फे पहिली ते आठवी इयत्तेतील शिक्षकांना ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा परिषदांना प्रति ओळखपत्रासाठी ५० रूपये निधी दिला आहे. मात्र गेल्या चार महिन्यासपासून यासंदर्भातील कोणतीच माहिती शिक्षकांना देण्यात आली नाही. त्यामुळे हे ओळखपत्र मिळणार तरी कधी ? असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. राज्यात संचार बंदी लागु केल्यामुळे प्रत्येक नागरिकांना प्रत्येक नाक्यावर पोलिसांकडून विचारपूस करण्यात येत आहे. अशी परिस्थिति असतांना राज्य सरकारने शाळेतील शिक्षकांना शाळेतील पोषक आहार योजनेतील शिल्ल्क धान्य वाटण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत कसे जायचे आणि विद्यार्थ्यांना धान्य कसे वाटायचे असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केले आहे.

Comments