लॉकडाऊन संपण्याआधी विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होणार
मुंबई
प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुळे संचार बंदी असल्यामुळे पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल दूरध्वनी, एसएमएस किंवा व्हाट्सएपच्या माध्यमातून जाहीर करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्यावतीने शाळांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हा निकाल स्थानिक संचार बंदी संपण्याआधी जाहीर करण्याची सूचना यावेळी शाळांना दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे.
राज्यात कोरोनाने पाय पसरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने शाळा - महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली. मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा रद्द करून शिक्षकांना सुट्ट्या देण्यात आल्या. पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेली कामगिरी पाहून त्यांचे निकाल जाहीर करण्याची सूचना शिक्षण विभागाच्यावतीने शाळांना देण्यात आली. त्यानुसार शाळांनी विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यास सुरू करणार आहे.
केंद्र सरकारच्यावतीने संचार बंदी वाढवली असून 17 मे पर्यंत वाहतूक सुविधा ठप्प असणार आहे. त्यामुळे निकालयाची प्रक्रिया सुरू करण्यास थोडा वेळ जाणार आहे मात्र शिक्षण विभागाने स्थानिक संचार बंदी संपण्याआधी निकाल जाहीर करण्याची सूचना शाळांना दिली आहे . त्यामुळे शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई कोकण विभाग संयोजक अनिल बोरणारे म्हणाले की, वर्षभरातील घटच चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे लॉकडाउन असल्याने शाळेतच आहेत. रेडझोन असल्याने मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना शाळेत पोहचता येत नाही. अनेक शिक्षकांचे १० वी बोर्डाचे पेपर देखील शाळेतच आहेत ते तपासून नियमकांकडे कसे पाठवावे याबाबतचा निर्णय अजूनही बोर्डाने घेतलेला नसल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा आणि शिक्षकांपुढील अडचणी पाहता निकालपत्र पालकांना देण्याची घाई करू नये.
बरोबर आहे इतर विचार न करता कुठला आहे आदेश काढतात की लाकडं नसल्यामुळे आणि सर्व कागदपत्रे शाळेत असल्यामुळे शिक्षक कुठल्याही प्रकारचं काम घरी बसून करू शकत नाही म्हणून यावर सविस्तर विचार व्हावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा जेणेकरून शिक्षकांना त्रास होणार नाही अशा निर्णयामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल दुसरी गोष्ट पालक वर्ग शिक्षक यांना फोन करून विचारतील की आम्हाला रिझल्ट कधी मिळेल आणि त्याचे उत्तर काय द्यावे द्यावे हे शिक्षकांपुढे मोठे आव्हान निर्माण होते म्हणून असे आदेश निर्गमित करणे आधी सारासार विचार करावा आणि योग्य ते निर्णय घ्यावा
ReplyDeleteसर्व समावेशक विचार करून निर्णय घेऊन कळविण्यात यावे ही विनंती.
ReplyDeleteनिकाल जाहीर करण्यास घाई करू नये. सर्व 1 ते 9 वर्गवर्गातील विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोट करावी लागनारच आहेत. वेट & वाँच .
ReplyDelete