राज्यभरातील शिक्षकांनी केला निषेध ; शिक्षकांचे महत्त्व प्रशासनाला कळते का ?
मुंबई
प्रतिनिधी
शिक्षक ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात मात्र या कोरोनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. अमरावतीमधील मूर्तिजापूर येथील दारूच्या दुकानावर होणारी गर्दी नियंत्रनात आहे की नाही हे तपासण्यासाठी चक्क शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राज्यभरातील शिक्षक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी शिक्षण घेण्यासाठी शाळेत गेले होते तर त्यांना शिक्षकांची नेमकी जबाबदारी काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
अमरावती येथील मूर्तिजापूर दंडाधिकारी कार्यालयाने दारूच्या दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चक्क शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर यामधील वरिष्ठ आणि कनिष्ठ शिक्षकांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. शिक्षक नेहमी वाईट सवयी सोडविण्यासाठी विध्यार्थ्यांना विविध शिक्षण देत असतो मात्र आता शिक्षकांनाच नागरिकांना दारू लवकर आणि कोणत्याही अडचणी शिवाय मिळत आहे की नाही हे पाहण्याचे दिवस आले आहे. त्यामुळे शिक्षकांचा हा सर्वात मोठा अपमान असल्याचा यावेळी स्पष्ट झाले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच यांच्यावतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केले आहे.
ही गोष्ट राज्यातील इतर शिक्षकांना कळल्यानंतर सर्वांनी आपापल्या पध्दतीने अधिकाऱ्यांच्या कारभाराचा निषेध व्यक्त केले आहे.शिक्षकांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे म्हणाले की, देश घडविण्याचे काम शिक्षक प्राध्यापक करत असतात अशा पवित्र क्षेत्रीत कार्य करणाऱ्या शिक्षकांना दारूच्या दुकानासमोर देखरेख करायला लावणे हा समस्त शिक्षकांचा अपमान आहे. असे पत्र काढणार्या अधिकाऱ्याला निलंबित करावे व शासनाने तातडीने हा आदेश मागे घ्यावा अशी मागणी बोरनारे यांनी केली.
अगदी बरोबर.
ReplyDeleteHa chukicha aahe
ReplyDeleteअगदी बरोबर.
ReplyDeletehech divas rahile hote pahayche
ReplyDeleteKharya aarthane adharmala suruwat zali aahe
ReplyDeleteAata pudhe Kay Kay pahave lagel