शाळांनी शैक्षणिक शुल्क वाढवू नये



शिक्षण विभागाचे सर्व बोर्डाच्या शाळांना आदेश
विद्या वाहिनी मराठी : मुंबई

राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे अशा परिस्थितीत शाळांनी 2020 - 21 या शैक्षणिक वर्षाची फी वाढवू नये असे स्पष्ट आदेश राज्य शिक्षण विभागाच्यावतीने सर्व बोर्डाच्या शाळांना दिले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही यावर सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आणि 22 मार्च 2020 पासून संचार बंदी लागू करण्यात आली. देशभरात संचार बंदी लागू असल्यामुळे सर्व कार्यालय आणि उद्योगधंदे बंद आहे. या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थिती पालकांवर शुल्क आकारणी आणि वाढीव शुल्क न लाधण्याचे निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आले . मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या. मात्र त्यावर कारवाई काय झाली याबाबत कोणतीही माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली नाही.
यंदाच्या 2020 - 21 या शैक्षणिक वर्षात शाळा कशा चालू होतील याबाबत अद्याप नियोजन करण्यात आले नाही मात्र नव्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही बोर्डाच्या शाळांनी शुल्क वाढ करू नये असे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षाची शैक्षणिक शुल्क भरले नाही त्यांना ती विविध टप्प्यात भरण्याची मुभा देण्याची सूचना यावेळी शिक्षण विभागाला देण्यात आली आहे.

Comments