महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
http://gestyy.com/eq31pk
मुंबई
प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रभाव आणखी किती दिवस राहील याचा अंदाज लावणे कठीण आहे त्यामुळे इतर बोर्डाने आपल्या अभ्यासक्रमात कपात करत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेदेखील पाचवी ते बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्क्यांनी कपात करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातील शाळा - महाविद्यालये उशीराने सुरू होणार आहे त्यामुळे केंद्रीय बोर्डाने आपल्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करत सुधारित अभ्यासक्रम सादर केले आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होणार असल्यामुळे हे वर्ष वेळेत संपवण्यासाठी अभ्यासक्रमात कपात करण्याची गरज होती. त्यामुळे परीक्षादेखील वेळेत होणार असून निकलदेखील लवकर लागणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण नियोजन तयार करून केंद्रीय बोर्डाच्या शाळांनी आपल्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव आहे त्यामुळे राज्यातील शाळा उशिराने सुरू होणार आहे. या शाळांमधील अभ्यासक्रम वेळेत शिकवून परीक्षा लवकर व्हावी यासाठी राज्य बोर्डाने नियोजन केले पाहिजे. यासाठी सर्वात प्रथम पाऊल म्हणजे अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याची गरज आहे. असे न केल्यास संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य बोर्डाने आपल्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. अभ्यासक्रम कमी करण्यासाठी अभ्यास मंडळ सदस्य, तज्ज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून आठ दिवसात मते मागविण्यात यावी. या मतांचे एक अहवाल तयार करून त्यासंदर्भात त्वरित निर्णय घेण्याची मागणी शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
आपली मागणी योग्य आहे. या मागणीला
ReplyDeleteमाझी सहमती आहे.