मुंबईतील भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांची पदोन्नती थांबवा


तिघांवर कठोर कारवाईची टीडीएफ संघटनेची मागणी
मुंबई
प्रतिनिधी
शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, शिक्षण निरीक्षक अनिल साबळे आणि मुश्ताक शेख यांना पदोन्नती मिळाली आहे मात्र हे तिघे अधिकारी मोठे भ्रष्ट्राचारी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ ) या संघटनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची पदोन्नती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीडीएफ संघटनेकडे या तिघे अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर केले असतानादेखील आतापर्यंत कारवाई का झाली नाही असा सवाल यावेळी उपस्थित होतो.
मुंबईतील शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, शिक्षण निरीक्षक अनिल साबळे आणि मुश्ताक शेख यांनी आपल्या कार्यकाळात अनेक घोटाळे केले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी टीडीएफ या संघटनेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे मात्र आश्वासनशिवाय त्यांना काहीच भेटत नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या तिघ्या अधिकाऱ्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप असतांनादेखील त्यांना पदोन्नती देण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आले आहे.
 टीडीएफ संघटनेने या तिघ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असणारे पुरावे राज्यपाल, मानव संसाधन विकास विभाग भारत सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण आयुक्तालय आणि शिक्षण संचालनालय यांचेकडे सादर केले. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आले नसल्याचे चित्र आहे. हे अधिकारी केवळ पैसे देणाऱ्या शिक्षकांचीच कामे करत असल्याचा आरोप टीडीएफ यांनी केला आहे. या तिघे अधिकाऱ्यांवरोधात चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली त्यानंतर अहवाल आला मात्र त्या अहवालानुसार कारवाई करण्यात येत नाल्याचे आरोप यावेळी टीडीएफने केले.
राजेन्द्र अहिरे, अनिल साबळे, आणि मुश्ताक शेख यांची पदोन्नती रद्द करून त्यांची मुंबई विभागाबाहेर  बदली करावी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची तसेच अवैध मार्गाने जमा केलेल्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश द्यावेत अशी विनंती शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

Comments

Post a Comment