बारावी निकालांच्या निमित्ताने...

निरंंजन कदम
 तहसीलदार-2019

आधीच सांगतो, मला बारावीला 57% होते, अगदी average विद्यार्थी होतो मी... पण आज तहसीलदार पदी निवड झाली आहे.
आज बारावीचा निकाल जाहीर झाला. ज्यांना चांगले गुण आलेत त्यांचे सर्वच अभिनंदन करतील. माझ्या तर्फेही त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
पण ही पोस्ट त्या सर्वांसाठी आहे ज्यांना जेमतेम गुण मिळाले आहेत.
मित्रांनो आणि विशेषतः पालकांनो,
बारावीची टक्केवारी म्हणजे सर्व काही नसतं, काही जणांना लवकर जाण येते ते बारावीत चांगले गुण मिळवतात पण काही जण मात्र काही ना काही कारणांमुळे असे खूप चांगले गुण मिळवण्यात मागे पडतात पण म्हणुन समाजाने त्यांच्यावर अयशस्वी असा शिक्का मारणे त्यांच्यावर अन्याय करणारे असेल. 
खरंतर या काळात अशा विद्यार्थ्यांना आपण आधार द्यायला पाहिजे, एक संधी द्यायला पाहिजे. आपल्याकडे गुन्हेगारांनाही सुधारण्यासाठी संधी दिली जाते मग आपल्याच मुलामुलींना ही संधी का नाकारायची?
म्हणुनच सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी याबाबत नक्की विचार करावा.
दुसरे असतात फुकटचे सल्ले देणारे तथाकथित हितचिंतक वजा नातेवाईक तथा लोक्स... तर हे नेहमीच काही ना काही म्हणनारच असतात त्यामुळे ह्या लोकांचं मनावर घ्यायचं नसतं कारण त्यांना अशी लुडबुड करण्याशिवाय दुसरं काही कामच नसतं.
आणि आता विद्यार्थ्यांसाठी एक विनंती,
मित्र-मैत्रिनींनो,
हे खरं आहे की बारावी एक महत्त्वाचा टप्पा असतो पण लक्षात घ्या बारावी म्हणजे सर्वस्व नसतं. आयुष्य पुन्हा पुन्हा संधी देत नसतं पण आता तुम्हाला एक संधी मिळते आहे तीच सोनं करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. चांगले गुण का आले नाहीत याची कारणं आपली आपल्याला माहीत असतात तेव्हा आता निर्धार करायचा की या कारणांवर प्रामाणिकपणे काम करून सुधारणा करायची आणि आता जी कुठली संधी मिळेल, ज्या कुठल्या graduation, diploma ला तुम्ही जाल त्यामध्ये top ला रहायचं ध्येय आता समोर ठेवा आणि जगाच्या यश अपयशाच्या व्यांख्यांमध्ये न अडकता स्वत:ची वाट बनवा आणि उत्तमाची आराधना करा. सर्वोत्तम बना!
तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

-निरंंजन कदम
 तहसीलदार-2019

(हा लेख सर्वांपर्यंत पोहोचवा 🙏)

Comments

Post a Comment