पदवीच्या विद्यार्थांप्रमाणे आम्हालाही पास करा
मुंबई
प्रतिनिधी
राज्यात कोरोना मोठा प्रभाव असल्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना मागील सत्राच्या आधारावर गुण देण्यात आले. मात्र यात अनेक विद्यार्थी नापास झाले त्यामुळे पदवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही पास करा या मागणीसाठी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी घरबसल्या उपोषण केले.
राज्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारच्यावतीने संचार बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्व शाळा बंद करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आले. पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मागील सत्राच्या आधारे गुण देण्याचे निर्णय यावेळी घेण्यात आले. याची अंमलबजावणी करत निकाल जाहीर करण्यात आले मात्र अनेक विद्यार्थ्यांना मागील परीक्षेत कमी मार्क असल्यामुळे त्यांना यावेळी नापास करण्यात आले. या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी होणार याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे हे वर्ष वाया जाणार असल्याची भीती नववी आणि अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे पदवीच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पास करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आम्हालाही पास करावे या मागणीसाठी नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनी घरबसल्या उपोषण केले.
शिक्षक परिषदेने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिक्षण विभागाल पत्र लिहून नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शक्य नसल्याने सर्वांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे म्हणाले की, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी एक दिवसाचे उपोषण केले. विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या मागण्यांचे फलक दाखवले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पहाता आम्ही या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सरकारने याकडे लक्ष न दिल्यास आणखी तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा दराडे यांनी यावेळी दिला.
Comments
Post a Comment