गरिबांच्या ‘ऑनलाइन’ शिक्षणाची जबाबदारी घ्या

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचे मत
मुंबई
प्रतिनिधी
कोरोनाचा प्रभाव राज्यात झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्व शाळा बंद आहे मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यास सुरुवात केले मात्र राज्यातील बहुतेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित आहे. ही ऑनलाइन शिक्षण पद्धतीने गरीब आणि सधन विद्यार्थ्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षणसंस्था, शिक्षक व विद्यार्थी यांनी गरीब गरजू विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण घेण्याची संस्थात्मक व व्यक्तिगत सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले. व्यावसायिकांनी आपल्या परिसरात सर्वांना अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण व वृद्धापकाळ सुरक्षेची व्यवस्था जनसाह्यता केंद्राच्या माध्यमातून सुरू करावे, अशी अपेक्षा देसरडा यांनी व्यक्त केली आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या आजाराने जगभरात साडेपाच लाख लोकांचा बळी गेला आहे. हा आजार हवेतून पसरणार असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे. या संकटात मानवाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे, असे मत प्रा. देसरडा यांनी व्यक्त केले आहे.
मानवाने हव्यासापोटी निसर्ग व्यवस्थेत अविवेकी हस्तक्षेप केला असल्यामुळे निसर्ग संतुलन ढासळले आहे. पृथ्वीचे तापमान वाढले आहे. जैववैविध्याचा ऱ्हास, वन्यजीवांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्यामुळे प्राणी जगातातील विषाणू संक्रमित झाले आहेत. परिणामी, मानवाची प्रतिकारक्षमता क्षीण झाली व साथ संसर्ग वाढत आहेत. सरकारने जाहीर केलेले धान्य व हजार पाचशेचे रोख साह्य सर्व गरजूपर्यंत पोहचले नाही, असे देसरडा यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर १५ लाख लोकसंख्येचे औरंगाबाद शहर, दोन कोटींचा मराठवाडा आणि १३ कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र 'लॉकडाऊन'मुळे बदलला आहे. पुढील काळात नागरिकांनी आरोग्य रक्षणासाठी हवा, पाणी व अन्न शुद्ध, विषमुक्त घ्यावे, असे आवाहन देसरडा यांनी केले आहे.

Comments

  1. According to a s BCC survey 93% of people in Maharashtra on less than rupees 100000 year so where can they buy a smartphone only those working in the field can know what difficulties children are facing for online education so I agree with you

    ReplyDelete

Post a Comment