राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या आँफलाईन ऐवजी आँनलाईन पद्धतीनेच कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री मा. ना.हसन मुश्रीफ साहेब,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.ना.प्रविण दरेकर सो. यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहीती शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१५ जुलै 2020 रोजी आदेश काढुन राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या दि.२७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार ३१ जुलै 2020 पुर्वी आँफलाईन पद्धतीने कराव्यात असे निर्देश दिले आहेत पण आँफलाईन पद्धतीने बदल्या केल्यास त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या आँनलाईन पद्धतीनेच होणे गरजेचे आहे.
आँनलाईन जिल्हांतर्गत बदल्या करत असताना सन २०१८ / १९ व सन २०१९/ २० च्या बदल्या मध्ये रॅण्डम राऊंड मध्ये व विस्थापित बदल्यामध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना ऑनलाईन बदल्यात विना अट प्राधान्याने बदलीची तरतूद असावी. तसेच महिला शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करून निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती, या समितीने राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली होती. या चर्चेत राज्यातल्या सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सर्व प्रतिनिधीनी जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीनेच कराव्यात अशी एकमुखी मागणी केलेली होती. समितीच्या अहवाला नुसार नवीन बदली धोरण जाहीर करून बदल्या करणे अपेक्षित असताना, सध्या कोविड-१९ चा संसर्ग वाढलेला असताना ऑफलाईन बदल्या करण्याचा घाट घालणे चुकीचे आहे.
२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणातील त्रुटी दूर करून ऑनलाइन पद्धतीनेच बदल्या करण्यात याव्यात . देशातील व राज्यातील कोविड-१९ व लाॅकडाऊन चा काळ विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै २०२० अखेर पर्यंत न करता १५ ऑगस्ट २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागांच्या वतीने ग्रामविकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ सो.,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.ना.प्रविण दरेकर सो. यांच्या कडे लेखी निवेदन ई-मेल व्दारे राज्याध्यक्ष श्री राजेश सुर्वे यांनी दिले
एकदम बरोबर ,घोडेबाजार पुन्हा सुरू होईल
ReplyDelete