मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) - सीबीएसई बोर्डाचा दहावीचा अाॅनलाईन निकाल १५ जुलै रोजी जाहीर होणार अाहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून निकालाच्या तारखेविषयी घोषणा केली. निशंक यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट अाॅफ लक अशा शुभेच्छादेखील ट्विटच्या माध्यमातून दिल्या अाहेत. सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. तसेच अॅपच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल समजू शकणार अाहे.
निकाल पाहण्यासाठी वेबसाईट - cbseresults.nic.in
Comments
Post a Comment