शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासन निर्णयाची होळी

 

मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील अनुदानित आणि विनानुदानित शाळांमध्ये शिपाई पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्यामुळे राज्यात मोठ्याप्रमाणात शिपाई अतरिक्त होणार आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी संघटणेकडून शिक्षण विभागाच्या या शासन निर्णयाची होळी करुन निषेध नोंदविण्यात आले. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शिपाई संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण असल्यामुळे हे निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

राज्यातील प्रमुख शिक्षकेतर कर्मचारी संघटनाची बैठक झाली असून या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित झाले होते. यावेळी म्हणाले की, शिक्षण विभागाने हे निर्णय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांना विश्वासात न घेता जाहीर केले आहे. २००५ पासून शिक्षण विभाग आकृतिबंधच्या नावाखाली शिक्षकेतर कर्मचारी पदे भरण्यास टाळाटाळ करत आहे. अशी परिस्थिति असतांना आता शिपाई पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात रान पेटविनार असल्याचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जाहिर करण्यात आले.  

Comments

  1. चलाख राजकारणी व हुशार अधिकारी ,यांच्या समोर सामान्य माणूस काय ,,,,,,,,करू शकतो हे दाखवण्याची वेळ आहे,,,,एकी दाखवा व ,,हुकूमशाही हाकला

    ReplyDelete

Post a Comment