मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभगाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्यास शिक्षण विभागाकडून मंजूरी देण्यात आली आहे.
ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती गठित करण्यात आली आहे. या योजनेसाठी काही निधी वितरित करण्यात येणार असून उर्वरित निधी योजनेनुसार देण्यात येणार आहे. सदर निधी संबधित योजनेसाठीच खर्च करावा लागणार आहे निकषांचे पालन करूनच निधी वितरित करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment