परीक्षा परिषदेतील भोंगळ कारभार थांबणे कठिन ?


परीक्षा आयोजनाच्या ठेक्यासाठी ब्लैकलिस्टेड कंपन्या पुढे  

मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचे निविदा प्रतिवर्षी काढण्यात येते मात्र एवढे पैसे घेऊन देखील योग्यपद्धतीने कामे न करणाऱ्या कंपन्यांना शिक्षण विभगाने काळ्या यादित टाकले आहेत. असे असतांनादेखील यावर्षी परीक्षांच्या कामासाठी परिषदेकडून मागविण्यात आलेल्या निविदा ब्लेकलिस्टेड कंपन्यांकडूनच आले आहे. त्यामुळे एवढ्या चूका आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या कंपन्यांनाच यंदादेखील परीक्षेचे कंत्राट मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे कारभार कधी सुधारणार असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्रत्येकवर्षी अनेक परीक्षा घेण्यात येतात या परीक्षा घेण्यासाठीसुमारे १० कोटी खर्च करण्यात येते. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणतील ठेका आपल्याला मिळावा म्हणून काही कंपन्या वर्षानुवर्षे अर्ज करत आहेत आणि त्यांनाच याचे कंत्राट गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे. त्यामुळे या कंपन्यांची मक्तेदारी तोडण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करत आहे मात्र काही अधिकाऱ्यांमुळे हे कंत्राट जुन्याच काळ्या यादितील कंपन्यांना मिळणार आहे. 

Comments

Post a Comment