शाळा बंद आंदोलन झाले आता पुढे काय ?


मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी कंत्राटी भरतीच्या विरोधात शाळा बंद आंदोलन करुन आपला निषेध नोंदविले मात्र पुढचे पाऊल काय असणार याबाबत कोणतीही रूपरेषा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटणेकडून सुचविण्यात आले नाही त्यामुळे पुढे काय होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षक प्रत्यक्ष अनुदानसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे. त्यामुळे आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना पुढे कोणते आक्रामक पाऊल उचलणार यावर सर्व शिक्षण विभागाचे पुढचे निर्णय प्रभावित होणार आहे. 


Comments