पुढील आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय



पालक, शिक्षक सकारात्मक

मुंबई, 21 : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यानुसार मुंबई आणि परिसरातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात यासाठी शिक्षक, पालक आग्रही आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात याबाबत स्पष्टता येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांने सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील काही भागातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने शाळेत विद्यार्थांची उपस्थिती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षक आग्रही झाले आहेत. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे महत्वाचे वर्ष असल्याने त्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार नवीन वर्षात 1 जानेवारीपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Comments